Suresh Khade : राज्य सरकारचा 'हा' निर्णय अन् मंत्री खाडे रिक्षा चालवतच पोहचले कार्यक्रमस्थळी

Shinde-Fadnavis government : ऑटो रिक्षा चालक-मालक कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.
Suresh Khade
Suresh KhadeSarkarnama

Sangli : शिंदे-फडणवीस सरकारने ९ मार्चला राज्याचा अर्थ अर्थसंकल्प सादर केला. यावेळी अर्थसंकल्पामध्ये रामोशी समाज, गुरव समाज, वडार समाज, लिंगायत समाज तसेच ऑटो रिक्षा चालक-मालक कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतला.

राज्य सरकारने रिक्षा चालक कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतल्यामुळे मंत्री सुरेश खाडे यांचा सांगलीतील मिरजेत सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मंत्री खाडे यांनी थेट रिक्षात बसून जाणे पसंत केले.

Suresh Khade
Pune : परीक्षेबाबत अधिसभाही नापास; पुणे विद्यापीठाच्या नवनियुक्त सदस्यांची पहिलीच सभा ठरली वादळी

मंत्री सुरेश खाडे यांनी शहरातून रिक्षाचे सारथ्य करत सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का दिला. थेट रिक्षा चालवून ते कार्यक्रमस्थळी पोहोचले. मंत्री महोदय रिक्षात आल्यामुळे सुरक्षा रक्षकांची आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचीही चांगलीच धावपळ उडाली.

Suresh Khade
सहकाराच्या राजकारणात राष्ट्रवादीला धक्का; तीन दिवसात दोन बॅंका निसटल्या : दिग्गज नेते असतानाही पराभवाचा सामना

मंत्री खाडे हे रिक्षा चालवत कार्यक्रम स्थळी पोहचले. तसेच कार्यक्रम स्थळी धनगर समाजाकडून त्यांचे ढोल वाजवून स्वागत करण्यात आले.

यावेळी मंत्री खाडे यांनीही ढोल वाजवण्याचा आनंद घेतला. दरम्यान, मंत्री खाडे यांनी रिक्षाचे सारथ्य केल्यामुळे शहरातील रिक्षा चालकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com