Satara : अडीच वर्षेच नव्हे.. पुढील दहा वर्षे त्यांना सत्तेसाठी तळमळावे लागेल...

शंभूराज देसाई Shambhuraj Deai म्हणाले, काँग्रेस Congress, राष्ट्रवादी NCP सत्तेत आली की लोकशाही Democracy टिकली. ते सत्तेतून बाजूला गेली की लोकशाहीला धोका threat to democracy होतो.
Ramraje Naik Nimbalkar, Shambhuraj Desai
Ramraje Naik Nimbalkar, Shambhuraj Desaisarkarnama

सातारा : रामराजेंचा पक्ष सध्या सत्तेत नाही. राष्ट्रवादीच्या लोकांना सत्तेशिवाय राहता येत नाही. सत्तेसाठी त्यांची ही तळमळ सुरू आहे. पण, पुढील अडीच वर्षेच नव्हे तर पुढील दहा वर्षे त्यांना सत्तेसाठी तळमळत राहावे लागणार आहे, असा टोला राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी रामराजेंना लगावला आहे.

फलटणच्या कार्यक्रमात विधान परिषदेचे माजी सभापती रामराजेंनी विरोधकांमुळे लोकशाहीला धोका निर्माण झाल्याचे वक्तव्य केलं होते. त्याविषयी मंत्री देसाई यांन विचारले असता त्यांनी रामराजेंवर सडकून टीका केली.

शंभूराज देसाई म्हणाले, काँग्रेस, राष्ट्रवादी सत्तेत आली की लोकशाही टिकली. ते सत्तेतून बाजूला गेली की लोकशाहीला धोका होतो. रामराजे साहेबांना मला नम्रपणे सांगायचे आहे की, हे तुम्हाला तुमच्या पुरतं दिसतंय. आम्ही विधानसभेत लोकशाही मार्गाने बहुमत सिद्ध केलं आहे. तसेच लोकशाही मार्गानेच विधान परिषदेत सभापतींची निवड केली आहे. बहुमताचा आदर लोकशाहीत केलाच पाहिजे. बहुमतालाच लोहशाहीत महत्व आहे.

Ramraje Naik Nimbalkar, Shambhuraj Desai
Koyana : कोयना जलविद्युत प्रकल्पग्रस्तांना पदभरतीत प्राधान्य... शंभूराज देसाई

मुळात रामराजे साहेबांना खंत आहे की, त्यांचा पक्ष सत्तेत नाही. त्यांचा पक्ष सत्तेतून बाहेर असल्याने राष्ट्रवादीच्या लोकांना सत्तेशिवाय राहता येत नाही. सध्या सत्तेसाठी त्यांची तळमत सुरू आहे. पण, त्यांना माझं सांगणं आहे की, पुढील अडीच वर्षेच नाही, तर पुढील दहा वर्षे देखील त्यांना सत्तेसाठी तळमळत राहावे लागणार आहे.

Ramraje Naik Nimbalkar, Shambhuraj Desai
Koregaon : आमदार शशिकांत शिंदेंच्या पराभवाचा वचपा काढणार...रामराजे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com