राज्यमंत्री यड्रावकर आमच्यासोबतच; त्यांच्याशी कोणतेही मतभेद नाहीत

गोकुळच्या निवडणुकीतही ते आमच्याबरोबरच होते.
Satej Patil-Rajendra Patil Yadravkar
Satej Patil-Rajendra Patil YadravkarSarkarnama

इचलकरंजी : राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर हे आमच्या सोबतच आहेत. ते महाविकास आघाडीतील मंत्री आहेत. गोकुळच्या निवडणुकीतही ते आमच्याबरोबरच होते, त्यामुळे त्यांच्यासोबत कोणतेच मतभेद नाहीत, असे कोल्हापूरचे पालकमंत्री आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सतेज पाटील यांनी स्पष्ट केले. (Minister of State Rajendra Patil Yadravkar is with us : Guardian Minister Satej Patil)

कोल्हापूर विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून राजकीय घडामोडींना आणि भेटीगाठींना वेग आला आहे. भारतीय जनता पक्षाकडून माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या स्नूषा शौमिका महाडिक यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर सौ. महाडिक यांचे नाव निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Satej Patil-Rajendra Patil Yadravkar
प्रकाश आवाडेंनी भाजपला पाठिंबा देताच सतेज पाटील कल्लाप्पाण्णांच्या भेटीला!

दरम्यान, चंद्रकांतदादांसोबतची बैठक झाल्यानंतर महादेवराव महाडिक हे थेट राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या भेटीसाठी जयसिंगपुरात गेले होते. त्याबाबत पत्रकारांनी विचारले असता पालकमंत्री पाटील यांनी वरील उत्तर दिले. इचलकरंजीच्या दौऱ्यावर आलेल्या सतेज पाटलांनी आज भारतीय जनता पक्षाला पाठिंबा जाहीर केलेल्या आमदार प्रकाश आवाडे यांच्या घरी भेट दिली. ते मुंबईत असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. पण, ज्येष्ठ नेते, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांचे त्यांनी आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांनी इचलकरंजीतून आपल्याला ८० ते ८५ टक्के मतदान मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Satej Patil-Rajendra Patil Yadravkar
आमदार विनय कोरे, प्रकाश आवाडे ठरवणार कोल्हापूरचा पालकमंत्री!

विरोधकांचे आव्हान गांभीर्याने घेत आहे, असे स्पष्ट करीत पाटील म्हणाले, ‘‘आम्ही महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवीत आहोत. विरोधकांनी जरी आव्हान दिले असले तरी आमची व्यूहरचना यशस्वी करणार आहोत. त्यामुळे निकाल आघाडीच्या बाजूनेच लागणार आहे. जिल्ह्यात महाविकास आघाडी एकसंध आहे. सगळीकडे चांगला पाठिंबा मिळत आहे. सध्या २५३ च्या पुढे आपल्या बाजूने मतदानाची आकडेवारी आहे. कोल्हापूर महापालिकेच्या नगरसेवकांचे मतदान नसले तरी काय फरक पडणार नाही.’’

Satej Patil-Rajendra Patil Yadravkar
गोकुळच्या निवडणुकीत महाडिकांबरोबर असलेले सत्यजित सरूडकर आता सतेज पाटलांच्या पाठीशी

शौमिका महाडिक यांचे नाव निश्चित झाल्यानंतर महादेवराव महाडिक हे स्वतः सक्रीय झाले आहेत. त्यांनी वेगवान हालचाली करत शुक्रवारीच (ता. १२ नोव्हेंबर) जयसिंगपूरमध्ये जाऊन राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची भेट घेतली होती. महाडीक स्वतःच मैदानात उतरल्याने त्यांच्या गटाची यंत्रणाही कामाला लागली आहे.

Satej Patil-Rajendra Patil Yadravkar
सतेज पाटलांना एकतर्फी वाटणारी निवडणूक झाली रंगतदार : महाडिकांच्या घरातीलच उमेदवार!

जयसिंगपूर नगरपालिकेत राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर गटाचे स्वीकृत्तसह एकूण १८ नगरसेवक आहेत. या नगरपालिकेत भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्षांसह १२ नगरसेवक आहेत, त्यामुळे यड्रावकर यांची या निवडणुकीतील भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. या पार्श्‍वभूमीवर महाडीक यांनी शुक्रवारी दुपारी चारनंतर कसबा बावडा येथील राजाराम कारखान्यात न जाता थेट जयसिंगपूर गाठून राज्यमंत्री यड्रावकर यांची भेट घेतली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com