महापालिका निवडणुका कधी? मुश्रीफांनी सांगितला मुहुर्त

ओबीसींच्या राजकीय आरक्षणामुळे राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबल्या आहेत.
 Hasan Mushrif
Hasan Mushrif Sarkarnama

कोल्हापूर : ओबीसींच्या राजकीय आरक्षणामुळे (OBC Reservation) राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच ग्रामपंचायतींच्या निवडणुका (Local Body Elections) लांबल्या आहेत. त्यामुळे या निवडणुका कधी होणार, याबाबत संभ्रम आहे. राज्य निवडणूक आयोगाने पावसाळ्यामध्ये निवडणुका घेता येणार नाही, असं प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहे. त्यानंतर आता राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीम (Hasan Mushrif) यांनी निवडणुका कधी होणार, याबाबतचे संकेत दिले आहेत.

कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणूकीत विजयी झालेल्या जयश्री जाधव यांचा सत्कार आणि विजयी मेळाव्यानिमित्त कदमवाडी येथे आयोजित कार्यक्रमात मुश्रीम यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, राज्यात ओबीसी आरक्षणासाठी पालिकेच्या निवडणूका पुढे ढकलल्या आहेत. आता मात्र पावसाळ्यानंतर पालिकेची निवडणूक निश्‍चितपणे होणार आहे. यासाठी प्रत्येकाने आपआपल्या भागातील शिल्लक असणारी सर्व विकासकामे तात्काळ करुन घ्या, असं आवाहन मुश्रीफ यांनी केले. 

 Hasan Mushrif
बाळासाहेबांचा 'तो' व्हिडीओ ट्विट करत राज ठाकरेंचा शिवसेनेवर निशाणा

मुश्रीफ म्हणाले, कोरोनामुळे एक वर्ष काम झाले नाही. भाजपाची सत्ता होती त्यावेळी थेट पाईप लाईनसाठी लागणाऱ्या अनेक परवानग्या मिळाल्या नाहीत. टीकाकार काहीही म्हणू देत आम्ही दुप्पट वेगाने काम सुरु केले आहे. येणाऱ्या दिवाळीतील पहिली अंघोळ काळम्मावाडी धरणातून येणाऱ्या पाण्यानेच घातली जाणार आहे.

 Hasan Mushrif
जेव्हा राज ठाकरे यांना मध्यरात्री २.४५ मिनीटांनी अटक करण्यात आली होती...

कोरोनामुळे अनेक अडचणी होत्या. तरीही महाविकास आघाडीने विकास कामे केले, असेही मुश्रीम यांनी सांगितले. यावेळी बोलताना पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) म्हणाले, कदमवाडी, भोसलेवाडी, जाधववाडी मध्ये पन्नास-पन्नास टक्के मतदान झाले आहे. पण, महानगरपालिका निवडणूकीत हीच टक्केवारी 75 टक्‍क्‍यांपर्यंत जाणार आहे. अशी कामे करुन दाखणार आहोत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com