मंत्री गडाखांचा पोलिस बंदोबस्तात भरला जनता दरबार

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख ( Shankarrao Gadakh ) यांनी सार्वजनिक कार्यक्रमात सहभाग नोंदविला.
मंत्री गडाखांचा पोलिस बंदोबस्तात भरला जनता दरबार
Police settlementSarkarnama

सोनई (जि. अहमदनगर) - नेवासे तालुक्यात मागील आठवड्यात झालेल्या वेगवान घडामोडींनंतर प्रथमच जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख ( Shankarrao Gadakh ) यांनी सार्वजनिक कार्यक्रमात सहभाग नोंदविला. आंबराई विश्रामगृह येथे कडक पोलिस बंदोबस्तात कार्यकर्त्यांच्या गाठीभेटीचा जनता दरबार पार पडला. ( Minister Gadakh's Janata Darbar was filled with police security )

मंत्रीपदाच्या अडीच वर्षांत मंत्री गडाख नेवासे तालुक्यात आल्यानंतर पोलिस बंदोबस्ताचा डामडौल ठेवत नव्हते. मात्र शुक्रवार (ता. 22) रोजी त्यांच्या स्वीय सहाय्यकावर झालेला गोळीबार व दोन दिवसांने व्हायरल झालेली धमकीची ऑडिओ क्लीप यामुळे पोलिस यंत्रणेने सतर्क होवून बंदोबस्तात वाढ केली आहे.

Police settlement
शंकरराव गडाख म्हणाले, हा हल्ला म्हणजे मला राजकारणातून संपविण्याचा कट

घटनेनंतर आठ दिवसाने मंत्री गडाख आंबराई विश्रामगृह येथे थांबले होते. सकाळी साडेनऊ ते तीन वाजेपर्यंत तालुक्यातील कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली. या ठिकाणी सहायक पोलिस निरीक्षक सचिन बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली तीन शस्रधारी व इतर आठ ते दहा कर्मचारी तैनात होते. साध्या वेशातील काही पोलिस तेथील हालचालीवर लक्ष ठेवून होते.

Police settlement
यशवंतराव गडाखांनी संकटाला कसे नमवले.... शंकरराव गडाख यांनी सांगितला अनुभव

सध्या मंत्री गडाखांच्या नगर व सोनई येथील घराबाहेर शस्रधारी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.तालुक्यात फिरत असताना त्यांच्या मोटारीच्या मागे, पुढे पोलिस वाहन असणार आहे, असे सहायक पोलीस निरीक्षक बागुल यांनी सांगितले.गोळीबार व ऑडिओ क्लीप वरील धमकी प्रकरणाचा संपुर्ण तालुक्यातील निषेध होत असुन गाठीभेटीच्या निमित्ताने सर्व कार्यकर्त्यांनी गडाखांना पाठिंबा असल्याचे सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.