मंत्री गडाखांच्या मणक्यात वेदना : तरीही आधार घेत केले मतदान, लगेच रुग्णालयात दाखल

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख ( Shannkarrao Gadakh ) यांना रिलायन्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मंत्री गडाखांच्या मणक्यात वेदना : तरीही आधार घेत केले मतदान, लगेच रुग्णालयात दाखल
Shankarrao Gadakh News Updates, Ahmednagar News in MarathiSarkarnama

अहमदनगर - विधानपरिषदेच्या सहा रिक्त जागांसाठी सध्या मतदान प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी मुंबईत गेलेले राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख ( Shannkarrao Gadakh ) यांच्या मणक्यात वेदना होत असल्याने त्यांना रिलायन्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ( Minister Gadakh suffers from spinal cord injury: Reliance hospitalized )

विधानपरिषदेच्या मतदानाची प्रक्रिया आज सकाळपासून सुरू आहे. शिवसेनेचे सर्व आमदार पवई येथील वेस्टइन हॉटेलमध्ये होते. मंत्री गडाख हे मतदानासाठी गेले असता त्यांचे जुने दुखणे पुन्हा उद्भवले. त्यामुळे त्याच्या मणक्याचा त्रास होत असल्याचे सांगितले जात आहे. (Shankarrao Gadakh News Updates)

Shankarrao Gadakh News Updates, Ahmednagar News in Marathi
शंकरराव गडाख म्हणाले, हा हल्ला म्हणजे मला राजकारणातून संपविण्याचा कट

त्यांना स्लीप डिस्कची समस्या निर्माण झाली आहे. त्यांना मुंबईतील खासगी रुग्णालयात चार दिवसांपासून उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांनी मतदान केल्यावर ते पुन्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत. विधानपरिषदेचे मतदान करण्यासाठी जाताना व्हील चेअर वर गेले. तेथे सेनेचे आमदार तसेच विधानपरिषदेचे उपसभापती नरहरी झिरवळ, शिरुरचे आमदार अशोक पवार, राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी गेटवर जात गडाख यांची विचारपूस केली. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही त्यांची विचारपूस करून काळजी घ्या असे सांगितले.

Shankarrao Gadakh News Updates, Ahmednagar News in Marathi
यशवंतराव गडाख म्हणाले, मिठाच्या खड्यापासून सर्वांनी सावध रहा

रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी ते इतर आमदारांचा आधार घेत विधानभवनातील मतदान केंद्रावर पोचले. तेथे त्यांनी मतदान केले. त्यानंतर ते रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत. मागील अनेक वर्षांपासून त्यांना पाठीचा आजार आहे. चार दिवसांपूर्वी प्रवासात मोठा जर्क बसल्याने त्रास सुरू झाला. मुंबई येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in