विमा कंपन्यांना कायद्याच्या माध्यमातून हिसका दाखवू!

संगेवाडीकरांनी अडविला कृषीमंत्र्याचा ताफा
Minister Dada Bhuses
Minister Dada Bhusessarkarnama

सांगोला : भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवडीचे थकीत अनुदान एक महिन्याच्या आत व मागेल त्याला शेततळ्याचे थकीत अनुदान 15 दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाईल. शेतकरी अडचणीत असताना पिकविमा (Crop Insurance) कंपन्यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकर मदत दिली पाहिजे. ज्या कंपन्या पैसे देण्यास वेळकाढूपणा करीत आहेत किंवा टाळाटाळ करीत आहेत, अशा कंपन्यांना कायद्याच्या माध्यमातून आम्ही हिसका दाखवू असे आवाहन कृषी मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी केले.

सांगोला तालुक्यांमध्ये अजनाळे येथे सोलापूर जिल्ह्यातील रिसोर्स फार्मर्स व विविध पीक स्पर्धा विजेते शेतकऱ्यांसोबत परिसंवादाच्या कार्यक्रम सहभाग घेतला. या परिसंवादात कृषिमंत्री दादा भुसे बोलत होते. या कार्यक्रमात आमदार शहाजी पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील, प्रबुध्दचंद्र झपके, सभापती राणी कोळवले, भाऊसाहेब रूपनर, रफिक नदाफ, शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार, जिल्हा कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, उपविभागीय आधिकारी आप्पासाहेब समिंदर, तहसिलदार अभिजित पाटील, तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे, कमरुद्धीन खतीब, सुनिल भोरे, विजय येलपले तसेच कृषी विभागातील अधिकारी, विविध पिक विमा कंपन्यांचे पदाधिकारी, राहुरी कृषी विद्यापीठ व डाळिंब संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ व शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमात कृषिमंत्र्यांच्या हस्ते विविध पीक स्पर्धा तील विजेत्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

Minister Dada Bhuses
अमेरिका भेटीत मोदींना मिळाल्या 157 मौल्यवान भेटवस्तू ; पहा फोटो

भुसे म्हणाले की, सांगोला तालुका डाळींबाचे आगार आहे. मात्र, डाळिंब उत्पादकांना सध्या मर, तेल्या व मूळकूज या रोगांमुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. या शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी व त्यांना सहकार्य करण्यासाठी महाविकास आघाडी कटिबद्ध आहे. प्रधानमंत्री पिक विमा ऐच्छिक केला असून हे चांगले केले आहे. दोन वर्षापासून केंद्र सरकारने विमा योजनेतून काढता पाय घेतला की काय अशी अवस्था झाली आहे. पिकविमा हा शेतकरी व सरकारला लूटण्याचा डाव आहे की काय असेच वाटत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांना अन्नदाता व दैवत्व मानत असल्याने शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्न सोडवण्यासाठी महाविकास आघाडी कायमच कटिबद्ध राहील, असे आश्वासन भुसे यांनी दिले.

यावेळी आमदार शहाजी पाटील म्हणाले, दुष्काळ ही सांगोला तालुक्याची असणारी ओळख बदलण्यासाठी आम्ही व आमचे सरकार नेहमी कटिबद्ध असणार आहे. तालुक्यात विविध पाणी प्रश्नांना निधी दिला असून यापुढेही तो आणण्याचा प्रयत्न केला जाईल. माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील म्हणाले की, शरद पवार साहेब या परिसराचे खासदार असताना शेतकऱ्यांना अनेक योजनेचा लाभ दिला. सध्याचे महाविकास आघाडीचे सरकारचे मंत्री शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत नेहमी येत आहेत हे महाविकास आघाडीचे धोरण सकारात्मक आहे. तालुक्याच्या अपूर्ण योजना पूर्ण केल्या स्वामी स्वस्त बसणार नाही. कार्यक्रमाचे प्रस्ताविक कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार यांनी केले. यावेळी विजय येलपले, सतीश पाटील यांनी मनोगते व्यक्त केली.

Minister Dada Bhuses
`ओबीसी`चा इम्पिरिकल डेटा केंद्र सरकारने यामुळे दडवला?

आमदार शहाजी पाटील हे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या कुटुंबातील एक सदस्य असून मुख्यमंत्री हे शहाजी बापूंचा एकही शब्द खाली पडू देत नाहीत. त्यामुळे तालुक्याच्या विविध विकास कामांना भरघोस निधी मिळत आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्या सोडविण्याकरिता मी आमदार साहेबांच्या वतीने कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन दादा भुसे यांनी केले.

संगेवाडीकरांनी अडविला कृषीमंत्र्याचा ताफा

दादा भुसे सांगोला तालुक्याच्या दौऱ्यावर येत असताना संगेवाडी येथील शेतकरी व काही शिवसैनिकांनी दादा भुसे यांचा ताफा अडवुन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. कृषिमंत्र्यांनीही शेतकरी रस्त्यावर थांबले असता त्यांना प्रतिसाद देत त्यांचे निवेदन स्वीकारले व त्यांच्याशी विवेदनातील विषयांवर चर्चाही केली. यावेळी कृषिमंत्र्यांनी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. या दौर्‍यात कार्यक्रम नसतानाही त्यांनी संगेवाडी येथे थांबून शेतकऱ्यांची विचारपुस केल्याने शेतकरी भारावून गेले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in