महाबळेश्वरच्या व्यापाऱ्यांची नाराजी मंत्री आदित्य ठाकरेंनी केली दूर...

मंत्री ठाकरे Aditya Thackeray यांनी महाबळेश्वरच्या Mahabaleshwar विकासाकडे Development plan लक्ष देऊन त्वरित शहराच्या सुशोभीकरणासाठी निधी Fund उपलब्ध केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
महाबळेश्वरच्या व्यापाऱ्यांची नाराजी मंत्री आदित्य ठाकरेंनी केली दूर...
Aditya Thackeray Latest News in Marathi, Latest Political Newssarkarnama

महाबळेश्वर : महाबळेश्वरचा विकास करताना कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, असे आश्वासन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी महाबळेश्वर शिष्टमंडळाला दिले. तसेच महाबळेश्वर बाजारपेठेच्या नियोजनात स्थानिक व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन आराखडा करावा, अशी सूचनाही त्यांनी केली. (Aditya Thackeray Latest News in Marathi)

मुंबई येथे मंत्रालयात शिवसेनेचे माजी शहरप्रमुख सुनील साळुंखे, युवासेना जिल्हाप्रमुख सचिन वागदरे यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवक रवींद्र कुंभारदरे, शहरातील व्यापारी केतन यादव, हेमंत साळवी, ॲड. संजय जंगम, अतुल सलागरे, संजय बोधले यांच्या शिष्टमंडळाने मंत्री ठाकरे यांची भेट घेतली.

Aditya Thackeray Latest News in Marathi, Latest Political News
आदित्य ठाकरेंचा ड्रीम प्रोजक्टवर न्यायालयाचा ठपका; महापालिकेला काम थांबवण्याचा आदेश

प्रथम मंत्री ठाकरे यांनी महाबळेश्वरच्या विकासाकडे लक्ष देऊन त्वरित शहराच्या सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. या वेळी महाबळेश्वरच्या व्यापाऱ्यांचा सुशोभीकरणाला कोणताही विरोध नाही. परंतु, बाजारपेठेच्या नियोजनामध्ये स्थानिक व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन आराखडा करावा, अशी मागणी मंत्री ठाकरे यांच्याकडे व्यापारी शिष्टमंडळाने केली.

Aditya Thackeray Latest News in Marathi, Latest Political News
ऊर्जामंत्री व पर्यावरण मंत्र्यांच्या उपस्थितीत ‘बुद्धिस्ट थीम पार्क’चे सादरीकरण

या वेळी मंत्री ठाकरे यांनी महाबळेश्वरकरांची कैफियत ऐकून घेतली. कुणावरही अन्याय होऊ देणार नाही. शहराचा योग्य विकास करण्यासाठी माझे प्रयत्न असून, त्यासाठी आवश्यक ती पावले उचलणार आहे. परंतु, येथील स्थानिक जनतेला विश्वासात घेऊनच येथील काम करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

Aditya Thackeray Latest News in Marathi, Latest Political News
महाबळेश्वर तालुक्यातील मांघर ठरले देशातील पहिले मधाचे गाव...

वास्तुविशारद जोशी, जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांची व्यापाऱ्यांबरोबर बैठक घेऊन पुढील नियोजन करण्याचे आश्वासनही त्यांनी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिले. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी विकास आराखड्याच्या नियोजनाच्या कामाला सुरुवात केली होती. वास्तुविशारद जोशी यांनी केलेल्या बाजारपेठेच्या आराखड्याबाबत व्यापाऱ्यांमध्ये नाराजी होती. याबाबत व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्यासह अनेकांशी संपर्क केला. परंतु, त्याला यश येत नसल्याने अखेर मंत्री ठाकरे यांची भेट घेतली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.