सोलापूरच्या सत्तेचा रिमोट ‘एमआयएम’कडेच ठेवा : ओवैसींचा खास व्यक्तीला संदेश!

सोलापूर महापालिकेबरोबरच झेडपीची निवडणूकही एमआयएम लढवणार : फारुख शाब्दी
सोलापूरच्या सत्तेचा रिमोट ‘एमआयएम’कडेच ठेवा : ओवैसींचा खास व्यक्तीला संदेश!
Farooq Shabdi-Asaduddin OwaisiSarkarnama

सोलापूर : एमआयएमचे (AIMIM) कार्य समाजातील तळागाळापर्यंत पोचवा. जास्तीत-जास्त युवकांना संधी द्या. मागील निवडणुकीपेक्षा जास्त नगरसेवक सोलापूर (Solapur) महापालिकेत निवडून आणून सत्तेचा रिमोट ‘एमआयएम’कडे ठेवण्याची सूचना खासदार असदुद्दिन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी दिली. सोलापूर महापालिकेसह जिल्ह्यातील नगरपरिषदा व जिल्हा परिषदेची निवडणूक एमआयएमच्या वतीने ताकदीने लढवा, असा आदेश खासदार ओवैसी यांनी दिला आहे, अशी माहिती एमआयएमचे सोलापूर शहराध्यक्ष फारुख शाब्दी (Farooq Shabdi) यांनी दिली. (MIM to contest ZP polls along with Solapur Municipal Corporation: Farooq Shabdi)

Farooq Shabdi-Asaduddin Owaisi
रोहित पवारांनी आम्हाला अहिल्यादेवींच्या जयंतीची परवानगी मिळू दिली नाही : राम शिंदे

भिवंडीला जलसा "हालात-ए-हाजरा" कार्यक्रमासाठी खासदार ओवैसी आले होते. त्यानंतर त्यांनी एमआयएमचे सोलापूरचे अध्यक्ष फारुख शाब्दी यांच्या मुंबईतील घरी जेवणाचा आस्वाद घेतला. त्यावेळी त्यांनी सोलापूरच्या राजकीय स्थितीची माहिती घेतली. सोलापुरात एमआयएमची चांगली कामगिरी होण्यासाठी पक्षाकडून पाहिजे ती मदत देण्यात येईल, असे आश्वासनही ओवैसी यांनी दिल्याचे शहराध्यक्ष शाब्दी यांनी सांगितले. सोलापुरातील राजकीय घडामोडी, पक्षात कोण कोण येण्याची शक्यता आहे?, पक्ष किती जागा लढवू शकतो, यासह इतर बाबींची माहिती खासदार ओवैसी यांनी घेतली.

Farooq Shabdi-Asaduddin Owaisi
मुख्यमंत्री ठाकरे हे शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वानकरांचे मनावर घेणार का!

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील व माजी आमदार वारीस पठाण यांनी येत्या काही दिवसात सोलापूरचा दौरा करावा, अशी सूचनाही खासदार ओवैसी यांनी केली. खासदार ओवैसी म्हणाले की, लोकसभा, विधानसभा आणि महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांमध्ये एमआयएमने चांगली कामगिरी केली आहे. ग्रामीण भागातील चांगले कार्यकर्तेही एमआयएमसोबत काम करण्यास तयार आहेत. त्यांना आपल्या सोबत घ्यावे. त्यासाठी ग्रामीण भागात दौरे करण्याची सूचनाही शहराध्यक्ष शाब्दी यांना करण्यात आली आहे. शाब्दी परिवाराच्या वतीने खासदार ओवैसी, खासदार इम्तीयाज जलील, माजी आमदार वारीस पठान, मोईन सय्यद, माजीद हुसैन यांच्यासह एमआयएमच्या इतर नेत्यांना सत्कार झाला.

Farooq Shabdi-Asaduddin Owaisi
विधान परिषदेसाठी मी इच्छूक; पण निर्णय भाजपनं घ्यायचाय : राम शिंदे

अकबरुद्दीन ओवैसींची तोफ सोलापुरात लवकरच धडाडणार

एमआयएमचे सोलापूर महापालिकेवर बारीक लक्ष आहे. सोलापूरकरांवर एमआयएमने केलेले प्रेम कायम ठेवण्यासाठी एमआयएमने रणनीती आखली आहे. येत्या काही दिवसांत एमआयएमचे तेलंगणाचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी हे सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत सोलापुरात युवकांचा मेळावा होणार आहे. या मेळाव्याची जय्यत तयारी करा, अशा सूचनाही खासदार ओवैसी यांनी शहराध्यक्ष शाब्दी यांना केल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in