मिलिंद नार्वेकरांनी साईबाबा, शनिदेवासमोर टेकविला माथा

शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी शिर्डीत साईबाबांचे तर शनिशिंगणापूर येथे जाऊन शनिदेवाचे सपत्निक दर्शन घेतले.
Milind Narvekar
Milind NarvekarSarkarnama

अहमदनगर - राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांचे मतदान व मतमोजणी काल ( शुक्रवारी ) झाली. यात शिवसेनेच्या एका उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला. अशातच आज शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी शिर्डीत साईबाबांचे तर शनिशिंगणापूर येथे जाऊन शनिदेवाचे सपत्निक दर्शन घेतले. मात्र उपस्थित पत्रकारांशी राजकीय विषयावर बोलणे टाळले. ( Milind Narvekar took darshan of Sai Baba, Shanideva )

शिवसेनेचे संजय पवार यांच्या पराभवावरून राज्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मात्र या आरोप-प्रत्यारोपांना दूर ठेवत शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर यांनी अहमदनगरचा खासगी दौरा काढला. या दौऱ्यात त्यांनी सपत्निक देवदर्शन केले. सकाळीच त्यांनी शिर्डी येथे जाऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी शिर्डी देवस्थानतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित पत्रकारांशी बोलण्यास त्यांनी नकार दिला.

Milind Narvekar
मिलिंद नार्वेकर थेट भाजप, राष्ट्रवादीशी पंगा घेणार

दुपारी त्यांनी शनिशिंगणापूर येथे जाऊन शनिदेवाचे दर्शन घेतले तसेच सपत्निक अभिषेकही केला. तेथेही त्यांनी पत्रकारांपासून दूर राहणेच पसंत केले. मिलिंद नार्वेकर यांच्या मौनावर जिल्ह्यात उलट-सुलट चर्चा रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com