'संचालकांच्या नातेवाईकांच्या नावाने कर्ज काढलं; पण कारखाना चालवला'

दामाजी साखर कारखाना निवडणुकीबाबत आमदार समाधान आवताडे गटाची बैठक
'संचालकांच्या नातेवाईकांच्या नावाने कर्ज काढलं; पण कारखाना चालवला'
Samadhan AvtadeSarkarnama

मंगळवेढा (जि. सोलापूर) : दामाजी कारखाना (Damaji Sugar Factory) चालविण्यावरुन विरोधकांनी बऱ्याच वावड्या उठविल्या. त्या मला तोंडपाठ झाल्या होत्या. या वर्षी कारखाना चालू होत नव्हता, तरीही अडचणींवर मात करुन कारखाना चालवून दाखविला. शेवटी सोन्याचा धूर जरी काढला तरी मस्ती आली म्हणून लोक नावे ठेवतच असतात, त्याकडे दुर्लक्ष करत शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम करत राहायचं. ते आमच्या संचालक मंडळाने केले आहे, असे आमदार समाधान आवताडे (Samadhan Avtade) यांनी सांगितले. (Meeting of MLA Samadhan Avtade Group regarding Damaji Sugar Factory Election)

श्री संत दामाजी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सत्ताधारी आमदार समाधान आवताडे गटाची विचारविनिमय बैठक भुयार(चिक्कलगी), आंधळगाव या ठिकाणी पार पडली. या दौऱ्यात ते बोलत होते. आमदार आवताडे म्हणाले की, कोरोनामुळे आमच्या संचालक मंडळाला एक वर्षाचा कालावधी वाढवून मिळाला. मात्र मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळ, अडचणीतील साखर उद्योग याचा सामना करत एकही गाळप हंगामात खंड न पडू देता कारखाना चालविला. कारखाना चांगला चालवण्यासाठी आम्ही संचालकांच्या नातेवाईकांच्या नावावर कर्ज काढून पैसे उपलब्ध केले. पण, त्याचा गाजावाजा केला नाही.

Samadhan Avtade
‘बारामती ॲग्रो’ला आदिनाथ भाडेतत्वावर देण्याच्या निर्णयाची ७ जूनला सुनावणी

ऊस उत्पादक व कामगारांच्या देण्याबाबत थोडं मागं पुढे झाले. पण, द्यायचा प्रयत्न केला. भ्रष्टाचार करुन किती चांगले राहता येते, हे मागील दहा वर्षांतील संचालकाची किती नावे किती लक्षात राहिली यावरून दिसून येते. राजकारण करताना तात्पुरते न पाहता चांगल्या पद्धतीने काम केल्यास लोक घरात बसू देत नाहीत. मागे लागून कामच करुन घेतात. संचालक मंडळाने वचननाम्यातील जेवढे आम्हाला करता येईल, तेवढ्या गोष्टी आम्ही केल्या आहेत. त्यामध्ये सभासदांना १० रुपये दराने सवलतीची साखर, सभासदांना अपघाती विम्याचे संरक्षण दिले. गाळपास आलेल्या उत्पादकांचे ऊसबिल थोडे मागे पुढे झाले, असेही आमदार आवताडे यांनी मान्य केले.

Samadhan Avtade
'विधान परिषदेबाबत मला कोणाचीही ऑफर नाही'

उमेदवारी निश्चित करताना परिस्थिती बघून ठरविले जाईल, त्या पध्दतीने जोड्या ठरवल्या केल्या जातील. या बैठकीत इच्छुक असणाऱ्यांनी संधी देण्याची मागणी केली. काही सभासदांनी आमदार समाधान आवताडे हेच उमेदवार समजून आम्ही पॅनेलच्या विजयासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.

Samadhan Avtade
महाविकास आघाडी झाल्यास आमदार अशोक पवार, राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढणार!

या वेळी कारखान्याचे उपाध्यक्ष अंबादास कुलकर्णी, संचालक पप्पू काकेकर, लक्ष्मण जगताप, सुरेश भाकरे, राजेंद्र सुरवसे, माजी सभापती प्रदीप खांडेकर, सचिन शिवशरण, अशोक माळी, प्रा येताळा भगत, सोमनाथ आवताडे, निला आटकळे, चंद्रकांत पडवळे, पांडुरंग नाईकवाडी, विजय बुरकूल,महादेव जाधव,बाबा कौडूभैरी,संतोष मोगले, विजयसिंह पाटील  आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in