मोहोळचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वस्व पणाला लावेन : अजितदादांचा राजन पाटलांना शब्द!

मोहोळ तालुक्यातील प्रश्‍नांवर ४ मे रोजी मंत्रालयात बैठक : अजित पवार
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

सोलापूर : शेती आणि पिण्याच्या पाणी प्रश्नासंदर्भात माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) आणि आमदार यशवंत माने (Yashwant Mane) यांनी काही मागण्या केल्या आहेत. जलसंपदा खाते पूर्वी माझ्याकडे होते, आता ते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant Patil) यांच्याकडे आहे. मोहोळच्या प्रश्नावर येत्या ४ मे रोजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आमदार यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील आणि माझ्या उपस्थितीत मंत्रालयात अधिकाऱ्यांबरोबर बैठक लावण्यात येईल. मोहोळ परिसरासाठी जे जे करता येईल, ते ते करण्यासाठी मी माझे सर्वस्व पणाला लावीन, हा शब्द मी आपल्या सर्वांना देतो, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राजन पाटील यांनी मांडलेल्या प्रश्नावर आश्वासित केले. (Meeting at Ministry on 4th May on issues of Mohol taluka: Ajit Pawar)

मोहोळ तालुक्यातील अनगर येथे नगरपंचायत झाल्याबद्दल आज (ता. ३० एप्रिल) कृतज्ञता मेळावा व शेतकरी मेळावा अनगरमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वरील शब्द दिला.

Ajit Pawar
चालीसा म्हणायला तुमचं घर कमी पडतंय का... अजित पवार

ते म्हणाले की, मोहोळ तालुक्याला मोठा वारसा लाभलेला आहे. तालुक्यातील काही भागात शेती आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न असल्याचा मुद्या राजन पाटील आणि यशवंत माने यांनी मांडला. त्या भागातील शेतजमिनी बागायती व्हाव्यात. ठिबक अथवा बंद पाईपलाईनद्वारे तरी पाणी द्यावे, अशी मागणी करण्यात आली. मोहोळमधील या प्रश्नांवर येत्या ४ मे रोजी मंत्रालयात चर्चा केली जाईल. त्यासाठी माजी आमदार पाटील, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आमदार माने आणि माझ्या उपस्थितीत अधिकाऱ्यांबरोबर बैठक लावण्यात येईल. जे जे तुमचे प्रस्ताव आहेत, ते चर्चेला घेतले जातील. पाणी उपलब्ध आहे का, त्यातून मार्ग कसा काढायचा. किती निधी दिला पाहिजे, याबाबत समारोसमोर चर्चा केली जाईल.

Ajit Pawar
शिल्लक ऊसावर तोडगा; कारखान्यांना टनाला दोनशे रूपये रिकव्हरी लॉस देणार...अजित पवार

अनगर आणि मोहोळ नरपंचायतीच्या इमारतीसाठी राजन पाटील यांनी प्रत्येकी दहा कोटी रुपये मागितले आहेत. मात्र, या वर्षी लगेच दहा कोटी रुपये मंजूर करता येणार नाही. पण, मुंंबईला गेलो की मोहोळ आणि अनगर नरपंचायतीसाठी प्रत्येकी पाच कोटी रुपये देण्यात येतील. ते पाच कोटी रुपये ३१ मार्चपर्यंत संपवले, तर लगेच उर्वरीत पाच कोटी रुपयेही देतो. तुम्ही देखणी वास्तू उभारावी, अशी सूचनाही अजित पवार यांनी या वेळी केली.

या मेळाव्याला सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, पालकमंत्री दत्तात्रेय भरणे, आमदार बबनराव शिंदे, आमदार संजयमामा शिंदे, मोहोळचे आमदार यशवंत माने, पारनेरचे आमदार नीलेश लंके, परभणीचे आमदार राहुल पाटील, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार अमरसिंह पंडीत, माजी आमदार दीपक साळुंखे, जिल्हाध्यक्ष बळिराम साठे, माजी महापौर महेश कोठे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com