Sharad Pawar News : मायावती, जयललिता यांना बहुमत मिळाले, पवारांना का नाही? शिवतारेंनी डिवचलं

Vijay Shivtare : बारामती लोकसभा उमेदवारीवरून बाळगले मौन
Vijay Shitare
Vijay ShitareSarkarnama

Baramati News : शिवसेनेचे उपनेते, प्रवक्ते विजय शिवतारे यांनी बारामती दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह उद्धव ठाकरे, काँग्रेसच्या नेत्यांवर टीका केली. राज्यात सर्वात जास्त लोककल्याणाची कामे केल्याचा दावा करणाऱ्या महाविकास आघाडीतील पक्षांनी कडबुळं करुन निवडणूक लढवू नयेत. त्यांनी स्वतंत्र लढावे, मग त्यांना समजेल की ते किती पाण्यात आहेत, अशी टीका त्यांनी केली.

शिवतारे म्हणाले, "उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसवाल्यांनो हिंमत असेल तर स्वतंत्र लढा, तुम्ही किती पाण्यात आहेत हे तुम्हालाच कळेल. भाजप-शिवसेना हे पक्ष लोकहिताच्या दृष्टीने महत्वपूर्ण काम करते. साखर उद्योगाला उर्जितावस्थेत आणण्यासाठी इथेनॉलसारखे निर्णय, महिलांना सवलतीच्या दरात बससेवा, भूविकास बँकेचे ९६४ कोटी कर्जमाफी, असे अनेक निर्णयांमुळे शेतकऱ्यांसह राज्यातील नागरिकांचा सरकारला प्रतिसाद वाढत आहे."

यावेळी शिवतारे यांनी राष्ट्रीय नेते असूनही शरद पवार (Sharad Pawar) यांना ७० च्या वर कधी जागा मिळाल्या नाहीत. त्यांना राज्यात कधीही बहुमत खेचून आणता आलेले नाही, अशी टीका केली.

शिवतारे म्हणाले, "पवार देशाचे नेते आहेत, त्यांनी बारामती (Baramati) आणि जिल्ह्यातच प्राबाल्य निर्माण केले आहे. राज्यात ७० च्या वर त्यांना जागा मिळालेल्या नाहीत. त्यांना कधी बहुमत मिळाले नाही. मयावतींना, जयललितांना, जगनमोहन रेड्डी यांना बहुमत मिळाले, मात्र राष्ट्रवादीला (NCP) कधीच बहुमत मिळालेले नाही. राष्ट्रवादी हा पक्षही काँग्रेसमधूनच बाहेर आलेला आहे, म्हणून त्यांनी काँग्रेस पळविला असं म्हणायचे का? हिंमत असेल तर माझे पवार, ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लोकांचं कल्याण करण्याची भावना असेल तर स्वतंत्र लढावे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस सगळ्यांनी कडबुळं न करता वेगवेगळे लढावे. चारी पक्ष वेगवेगळे लढली तर २२५ जागा शिवसेना आणि भाजपलाच मिळतील."

Vijay Shitare
Pankaja Munde : पराभव झाल्याने खूप शिकायला मिळालं; पंकजा मुंडेंनी सांगितल्या अनुभवाच्या गोष्टी

शिवतरे यांनी बारामतीचे वैभव हे पूर्व-पश्चिम भागापुरते मर्यादित असल्याचे सांगितले. त्यांनी जिरायती भागातील पाणी टंचाईवरून पुन्हा शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार (Ajit Pawar) यांना लक्ष केले.

शिवतरे म्हणाले, "बारामतीमध्ये जिरायती भागाचा 50 वर्ष पाण्याचा प्रश्न सुटला नाही, तो प्रश्न मी शिवसेना -भाजप सरकारच्या माध्यमातून सोडविणार आहे. बारामतीत जे काही अधिकचे चांगले झाले आहे, ते अजित पवारांनी कष्टांनी केले हे मी नाकारत नाही. त्यांच्या कामाचा मी प्रशंसक आहे. परंतु पाण्यासारखे अनेक असे प्रश्न या तालुक्यात आहे ते सोडविण्यासाठी आणि येथील प्रस्थापितांच्या विरूद्ध असलेल्या युवकांना एकत्र करून शिवसेना वाढविण्याचा प्रयत्न माझा आहे."

नीरादेवधर धरणातील पाणी फलटण, माळशिरस भागात वळविण्याच्या भाजपचा प्रयत्न आहे. यावर शिवतारे म्हणाले, "नीरादेवधर धरण, गुंजवणीतील पाणी ज्यांच्या वाट्याचे आणि हक्काचे असेल त्यांना मिळण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आपल्याला दुःख वाटायचे कारण नाही. परंतु हे कमी होणाऱ्या पाण्यावर मार्ग काढण्यासाठी ठिबक सिंचन प्रणाली, शेततळी आणि गळतीचे प्रमाण कमी करावे. त्यामुळे पुरंदर, बारामती आणि इंदापूर तालुक्यातील शेतीला पुरसे पाणी उपलब्ध होईल. सुप्रिया सुळे यांनी केंद्राकडून बारामतीत कामगारांसाठी अद्ययावत रुग्णालय मिळविले आहे. वास्तविक हे शासनस्तरावरील रुग्णालायाचा दिवेघाट परिसरात झाल्यास सर्वांना फायदा होईल. परंतु त्यांनी बारामती लोकसभा मतदार संघातील इतर तालुक्याचा विचार केला नाही,याचे दुखः वाटते."

Vijay Shitare
Hindu Jan Garjana March News : `औरंगाबाद` वर चिखल अन् दगडफेक, इम्तियाज यांच्या नावाला शाई फासली..

लोकसभेच्या उमेदवारीवर शिवतारे यांचे मौन...

- बारामती लोकसभा मतदारसंघाचा उपनेता आणि संपर्कनेता आहे. शिवसेना वाढीचे काम मुख्यमंत्र्यांनी सोपवलं आहे. ते दिवसरात्र एक करून करणार आहे. केंद्र व राज्य सरकारची कामे लोकांपर्यंत नेणार आणि जनतेमध्ये शिवसेनेची ताकद वाढविणार. त्यामुळे लोकसभेचा कोण उमेदवार आहे, हे न पहाता मी पक्ष वाढीचे काम करणार आहे. लोकसभा उमेदवार हे पक्षश्रेष्टी ठरविणार आहेत, असे सांगून शिवतरे यांनी आपल्या उमेदवारीबाबत मौन बाळगले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com