मंत्री गडाखांच्या स्वीय सहाय्यकावरील हल्ल्याचा मास्टरमाईंड गजाआड

राहुल राजळे यांच्यावर गोळीबारातील मास्टरमाईंड समजला जाणाऱ्या ऋषिकेश वसंत शेटे या आरोपीला आज स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने हनुमानवाडी (ता. नेवासे) येथून अटक केली.
The police team arrested the accused
The police team arrested the accusedSarkarnama

सोनई (जि. अहमदनगर) - राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख ( Shankarrao Gadakh ) यांचे स्वीय सहाय्यक राहुल राजळे यांच्यावर गोळीबारातील मास्टरमाईंड समजला जाणाऱ्या ऋषिकेश वसंत शेटे या आरोपीला आज स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने हनुमानवाडी (ता. नेवासे) येथून अटक केली. गडाखांच्या कार्यकर्त्यांनी या कारवाई बद्दल पोलिस यंत्रणेचे जोरदार स्वागत केले. ( Mastermind arrested for attack on Minister Gadakh's personal assistant )

मंत्री गडाखांचे सोनई येथील कामकाज आटोपून स्वीय सहाय्यक राजळे आपल्या घरी चालले असताना लोहगाव शिवारात तीन ते पाच जणाने पिस्तुलातून पाच गोळ्या झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. यातील एक गोळी राजळे यांना लागली होती. विकास राजळे यांच्या फिर्यादीवरून चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज शुक्रवारी पहाटे शेटे यास त्याच्या राहत्या घरापासून जवळ अटक करण्यात आली.

The police team arrested the accused
शंकरराव गडाख म्हणाले, पारनेरकरांनी मंत्री पदाची संधी हुकवली...

स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक अनिल कटके, सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे, गणेश इंगळे व पथकाने ही कारवाई केली. शेटे यास अटक झाल्याचे समजताच सोनई परिसरात समाधान व्यक्त करण्यात आले. तपास अधिकारी पोलिस उपअधीक्षक सुदर्शन मुंढे, पोलिस निरीक्षक विजय करे यांनी आरोपीची कसून चौकशी केली. चार पैकी तीन आरोपीस अटक झाली असून बबलू लोंढे हा अजूनही फरार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com