मागासवर्गीय आयोगाचे काम सुरू करा, अन्यथा लढा उभारणार ; भाजपचा इशारा

''मराठा समाजाची आरक्षणाबाबत (Maratha Reservation)फसवणूक करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने समाजाची माफी मागावी,'' अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे समरजितसिंह घाटगे यांनी केली.

मागासवर्गीय आयोगाचे काम सुरू करा, अन्यथा लढा उभारणार ; भाजपचा इशारा
Maratha Reservationsarkarnama

कोल्हापूर : ''फडणवीस सरकार बदलल्यानंतर मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) बाजू महाविकास आघाडी सरकारला (Thackeray government) मांडता आली नाही. परिणामी आरक्षण रद्द झाले," असा आरोप भाजपनं (BJP) केला आहे.

''मराठा समाजाची आरक्षणाबाबत फसवणूक करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने समाजाची माफी मागावी,'' अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. ''मागासवर्गीय आयोगाचे काम त्वरित सुरू न झाल्यास लवकरच लढा उभारला जाईल,'' असा इशाराही त्यांनी दिला.

घाटगे म्हणाले, "विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पाठपुरावा केला. मराठा समाजाला न्याय देण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण त्यांनी २०१८ ला समाजाला मिळवून दिले. त्याचा मराठा समाजातील मुलांना शिक्षण व नोकरीत फायदा झाला.

Maratha Reservation
भाजपला मोठा धक्का ; पाच नगरसेवक शिवसेनेत..

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला निधीची तरतूद केली. व्याज परताव्याची योजनेसह सारथी संस्थेला शिष्यवृत्ती देण्याबाबत पाठपुरावा केला. सरकार बदलल्यानंतर मराठा आरक्षणाची बाजू महाविकास आघाडी सरकारला मांडता आली नाही. परिणामी आरक्षण रद्द झाले."

घाटगे म्हणाले, "आरक्षण रद्द झाल्यानंतर किती बैठका झाल्या? किती विद्यार्थ्यांना शुल्कात सवलत मिळाली? महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांच्या नियुक्त्यांचे काय झाले ? अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला आर्थिक तरतूद किती झाली? किती वसतिगृहांचे भूमीपूजन झाले? सारथीला किती निधी मिळाला? मागासवर्गीय आयोगाच्या किती बैठका झाल्या, या प्रश्नांची उत्तरे सरकारने द्यायला हवीत." पस्तीस वर्षांत जे झाले नाही ते मागील सरकारने केले. महाविकास आघाडी सरकार मात्र वेळ काढण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. पत्रकार परिषदेस महेश जाधव, विजय जाधव, राहुल चिकोडे, अशोक देसाई, भगवान काटे उपस्थित होते.

आरक्षणासाठी लढा उभारू

उपमुख्यमंत्र्यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांना आरक्षणाबाबत शब्द दिला होता. संभाजीराजेंनी आरक्षणाबाबत चांगला पाठपुरावाही केला. सरकारने मात्र तो विषय गांभीर्याने घेतला नाही. पक्ष म्हणून आम्ही सगळे एकत्र येऊन आरक्षणासाठी लढा उभारू, असे घाटगे यांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in