हे कोल्हापूर आहे! मुस्लिम बांधवांनी शिवजयंती सोहळ्यात सोडला अखेरचा रोजा

Hindu | Muslim | Kolhapur : कोल्हापुरने दिला एकतेचा आणि सामाजिक सलोख्याचा संदेश
Hindu - Muslim Kolhapur, Kolhapur Latest Marathi News
Hindu - Muslim Kolhapur, Kolhapur Latest Marathi News Sarkarnama

कोल्हापूर : संपूर्ण महाराष्ट्रात सध्या मशिदींवरील भोंग्यावरुन धार्मिक वातावरण तापलेलं आहे. त्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था कायम राहण्यासाठी हिंदू-मुस्लिम (Hindu-Muslim) समाजाला पोलिसांकडून शांततेचं आणि सामाजिक सलोखा कायम ठेवण्याचं आवाहन करण्यात येत आहे. त्याचवेळी कोल्हापुरमध्ये (Kolhapur) मात्र काहीस वेगळं आणि धार्मिक सलोखा कायम ठेवणारं समाधानकारक चित्र पाहायला मिळालं. (Kolhapur Latest Marathi News)

काल राज्यभरात परंपरेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhtrapati Shivaji Maharaj Jayanti) जयंती साजरी करण्यात आली. कोल्हापूरमध्ये देखील ही शिवजयंती अत्यंत उत्साही वातावरणात पार पडली. जय शिवाजी जय भवानी’ अशा जयघोषात प्रतिमापूजन करण्यात आले. त्यानंतर आयोजित करण्यात आलेले सांस्कृतिक कार्यक्रम, भव्य मिरवणुका आणि त्यातील ढोल-ताशांचा गजर, चित्तथरारक मर्दानी खेळ, घोडे, उंट, मावळ्यांचे सजीव चित्र, हलगी ताफा, लेझीम यामुळे वातावरण शिवमय झाले होते.

Hindu - Muslim Kolhapur, Kolhapur Latest Marathi News
भोंग्या' मागचा खरा 'ढोंग्या' नागपूरचा : सुनिल शेळके

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सायंकाळच्या याच मिरवणुकीत रोजा सोडण्याची वेळ झाल्यानंतर अनेक मुस्लिम बांधवांनी पवित्र रमजान महिन्यातला शेवटचा रोजा सोडलेला पाहायला मिळाला. त्यामुळे हिंदू-मुस्लिम समाजाने कोल्हापुरातून संपूर्ण राज्याला आदर्श ठरेल असा एकतेचा आणि सलोख्याचा संदेश दिला आहे. यावर्षी कोरोनानंतर निर्बंध मुक्त कार्यक्रमांमुळे कोल्हापुरमध्ये मंडळांनी संस्था पातळीवर शिवजयंती साजरी करण्यापेक्षा परिसरातील मंडळांनी एकत्रित येऊन शिवजयंती करण्यावर भर दिला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com