BJP Leader's Secret Explosion: फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा मोठा गौप्यस्फोट : ‘महाविकास आघाडीचे अनेक नेते भाजपच्या उंबरठ्यावर’

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीला २०० पेक्षा अधिक जागा मिळतील
Shrikant Bhartiya
Shrikant BhartiyaSarkarnama

पंढरपूर : राज्यातील जनतेमध्ये शिंदे-फडणवीस सरकारबद्दल प्रचंड सहानुभूती आहे, त्यामुळे जनमताच्या जोरावर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप (BJP) आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीला २०० पेक्षा अधिक जागा मिळतील, असा विश्वास आहे. निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) अनेक प्रमुख नेते भाजपमध्ये येतील. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये काही शिल्लक राहणार नाही, असा मोठा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू आमदार श्रीकांत भारतीय (Shrikant Bhartiya) यांनी केला. (Many leaders of Mahavikas Aghadi will join BJP; MLA Shrikant Bhartiya's secret blast)

भाजपच्या महाविजय-२०२४ मशिनच्या प्रदेश संयोजकपदी भारतीय यांची निवड झाली आहे. निवडीनंतर सोमवारी (ता. १३ फेब्रुवारी) ते प्रथमच विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला आले होते. दर्शनानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार पुन्हा राज्यात सत्ता मिळवेल, असा आशावादही व्यक्त केला. या वेळी आमदार समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, राम सातपुते, भाजपचे राजाभाऊ जगदाळे, प्रणव परिचारक, विठ्ठल साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील, डाॅ. बी. पी. रोंगे, तालुकाध्यक्ष भास्कर कसगावडे आदी उपस्थित होते.

Shrikant Bhartiya
Girish Mahajan News: अनिल देशमुखांना भाजपमध्ये यायचे होते : गिरीश महाजनांचा गौप्यस्फोट

भारतीय म्हणाले की, नाशिक येथे नुकत्याच झालेल्या भाजप प्रदेश कार्यकारी समितीच्या बैठकीत निवडणुकी संदर्भात अनेक विषयांवर चर्चा झाली आहे. ‘अब की बार दो सो पार’ अशी घोषणाही करण्यात आली आहे. कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारी लागण्याचे सांगण्यात आले आहे. निवडणुकीच्या दृष्टीने सोशल मीडियाचा अधिक वापर करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चिन्हावर लढवण्याचा शेवटपर्यंत आग्रह राहील, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

Shrikant Bhartiya
Eknath Shinde News : कट्टर समर्थकांना फोडत मुख्यमंत्र्यांनी जितेंद्र आव्हाडांना दिला हा इशारा

केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असल्यामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये मोदींविषयी प्रचंड आदर आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्व जागांवर भाजप व मित्र पक्ष जिंकेल, असा विश्वासही व्यक्त केला.

Shrikant Bhartiya
Sangola News : गणपतआबांच्या अंत्यविधीवेळी घडलेल्या प्रकाराबद्दल शेकाप नेत्याने मागितली जाहीर माफी

कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीत भाजपसमोर कोणतेही आव्हान नाही. दोन्ही जागांवर भाजप सहज विजय मिळवेल. कितीही घरोघरी जाऊन प्रचार केला तरी काही फरक पडणार नाही, असा टोलाही त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावला. महाविकास आघाडीचे नेते अस्वस्थ आहेत, तर काही प्रमुख नेते भाजपात येण्यास इच्छुक आहेत. निवडणुकीपूर्वी अनेक नेते भाजपत येतील, असा मोठा गौप्यस्फोटही भारतीय यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com