मुख्यमंत्र्यांचा राष्ट्रवादीला मोठा धक्का; पवारांनी ताकद दिलेल्या नेत्यांचा शिंदे गटात प्रवेश होणार

Solapur News : राष्ट्रवादी काँग्रेसला सोलापूरमध्ये मोठे खिंडार पडणार आहे.
Eknath Shinde, Sharad Pawar
Eknath Shinde, Sharad PawarSarkarnama

Solapur News : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते माजी महापौर महेश कोठे (Mahesh Kothe) लवकरच बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गटात) पक्षात प्रवेश करणार आहेत. कोठे अनेक दिवसापासून राष्ट्रवादीमध्ये नाराज असल्याची चर्चा होती. त्यानंतर त्यांनी अखेर आपला पुढील राजकीय मार्ग निवडला आहे. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी हिरवा कंदील दिला आहे. शिंदेचे निकटवर्तीय मंगेश चिवटे यांनी सोलापूरमध्ये वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात याबाबत भाष्य केले आहे.

चिवटे यांनी भाषणाच्या सुरुवातीला कोठे यांच्या नावाचा उल्लेख करताना शहराचे माजी महापौर आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेचे भावी आमदार असे म्हटले. त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या. तसेच त्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार असल्याचे देखील चिवटे यांनी स्पष्ट केले. यामुळे सोलापूरमध्ये राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडणार आहे. सध्या शिंदे गटात मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरु आहे.

Eknath Shinde, Sharad Pawar
Uddhav Thackeray : आमच्याकडे बरेच बॉम्ब, फक्त वाती पेटवण्याचा अवकाश...; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

कोठे यांनी सोलापूर शहराचे महापौर पद, विरोधी पक्षनेतेपद अशा विविध जबाबदारी पार पाडल्या आहेत. २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत कोठे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांना सोलापूर शहरमध्य मतदार संघातून शिवसेनेने तिकिट दिले होते. मात्र, त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर त्यांची जिल्हाप्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली होती.

त्यानंतर २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने कोठे यांच्याजागी दिलीप माने यांना तिकिट दिले. त्यावेळी कोठे यांनी माने यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यामध्ये माने यांच्या पेक्षा अधिक मते मिळाली होती. बंडखोरी करुनही त्यांच्याकडील महापालिकेतील विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी कायम राहिली. यानंतर २०२१ मध्ये कोठे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याचे जाहीर केले होते.

Eknath Shinde, Sharad Pawar
सोलापूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी निलंबित : आरोग्य मंत्री सावंतांची विधान परिषदेत घोषणा

शरद पवार यांच्या फेसबुक पेजवरुन त्यांचा पक्षप्रवेश झाला असल्याची पोस्टही टाकण्यात आली होती. मात्र, काही वेळातच पोस्ट डिलीट करण्यात आली, त्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशाला ब्रेक लागल्याची चर्चा झाली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी कोठे यांची शिवसेनेतून हकालपट्टी केली होती. कोठेंवर आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसने दिली होती. कोठे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्यानंतर सोलापूरमध्ये पक्षाला फायदा होईल, असा दावा केला जात होता. मात्र, आता ते शिंदे गटात प्रवेश करणार आहेत, त्यामुळे राष्ट्रवादीला धक्का बसला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com