‘मी मंगळवेढेकरांना शब्द दिलाय; सिंचन योजनेची फाईल तेवढी मार्गी लावा’ : फडणवीसांचा शिंदेंना निरोप

मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस लवकरच मंजुरी मिळणार : समाधान आवताडे
Samadhan Avatade
Samadhan AvatadeSarkarnama

मंगळवेढा (जि. सोलापूर) : ‘‘नवे सरकार अस्तित्वात आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) बोलत असताना फडणवीसांनी मला बोलावून घेतले. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंना सांगितले की, मंगळवेढा उपसा सिंचन योजनेची फाईल तुमच्याकडे आहे, तेवढी मार्गी लावा. या योजनेबाबत मी मंगळवेढेकरांना पोटनिवडणुकीत शब्द दिला आहे,’’ असे पंढरपूर-मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे (Samadhan Avatade) यांनी सांगितले. (Mangalvedha Upsa Irrigation Scheme to be approved soon: Samadhan Avatade)

दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचारासाठी निंबोणी येथे झालेल्या प्रचारसभेत आमदार समाधान आवताडे यांनी वरील माहिती दिली. ते म्हणाले की, राज्यातील सत्ताबदलामुळे मंगळवेढ्याचा पाणीप्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहेत, त्यामुळे गेली अनेक वर्ष रखडलेली पाणी योजना मार्गी लावण्यासाठी दामाजी कारखान्याच्या निवडणुकीनंतर पाठपुरावा करून मंजुरी मिळवणार आहे, असा विश्वास आवताडे यांनी व्यक्त केला.

Samadhan Avatade
देवेगौडांनी नाथा शेवाळेंवर सोपवली महाराष्ट्रातील मोठी जबाबदारी!

आमदार आवताडे म्हणाले की, वीस साखर कारखाने निर्माण व्हावेत, एवढा माझा उद्योग आहे. मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांची फिकीर असल्याने हा उद्योग भावावर सोपवून साखर कारखान्यातून सभासदाचे हित साधण्याचा प्रयत्न केला. कारखान्यावर कर्जाचा डोंगर असताना आमचे संचालक मंडळ सत्तेवर आले. सहा वर्षांच्या काळात एकही हंगाम बंद न ठेवता कारखाना चालवून दाखवला. मी शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी ओतणारा नसून गोरगरिबांच्या संसाराची चूल पेटवणारा लोकप्रतिनिधी आहे.

Samadhan Avatade
शिंदे सरकारचा विस्तार ठरला : मलईदार खाती भाजपला; नगरविकासवर शिंदेंची बोळवण

माझा सभासदांवर पूर्ण विश्वास असल्यामुळे मला पराभूत करण्यासाठी एकमेकांच्या सावलीला न जाणारे सर्वजण एकत्र आले. पण, ज्यांनी मला कारखान्याचा अध्यक्ष व आमदार केले. जोपर्यंत त्यांच्या मनात आहे, तोपर्यत मला कोणीही पराभूत करून शकत नाही. माझ्यावर टीका करणारे फोनवर बोलताना चांगले बोलतात. चांगल्या कामासाठीचा योग्य सल्ला माझ्याशी न बोलता वृत्तमानपत्रातून सभेतून देतात. चुकीच्या पद्धतीने आधार नसलेले बिनबुडाचे आरोप करून टीका करत असले तरी सभासद अशा टीकेला महत्त्व देत नाहीत, असे आवताडे यांनी नमूद केले. दामाजी कारखाना निवडणुकीच्या प्रचारासाठी आवताडे यांनी बठाण, ब्रम्हपुरी, सिध्दापूर, अरळी, बोराळे, नंदूर, कागष्ट, निंबोणी, सलगर बु, हुलजंती, गावाच्या प्रचार दौरा केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com