Maan : माण, खटाव मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हेच माझं मंत्रिपद...

गत विधानसभा Vidhansabha Election निवडणूक प्रचारादरम्यान, श्री. फडणवीस Devendra Fadanvis यांनी आमदार गोरेंना MLA Gore मंत्रिपद ministership देणार असल्याचे जाहीर वक्तव्य केले होते.
Jaykumar Gore, Devendra Fadanvis
Jaykumar Gore, Devendra Fadanvissarkarnama

गोंदवले : माझ्या माणच्या विकासासाठीचे सर्व प्रश्न सुटावेत यासाठीच माझा सदैव प्रयत्न राहिला आहे आणि यापुढेही राहणार आहे. माण-खटावचा विकास हेच माझे मंत्रिपद आहे, असे मत भाजपचे आमदार जयकुमार गोरे Jaykumar Gore यांनी व्यक्त केलंय.

माणला मंत्रिपद देण्याचा शब्द सत्ताबदलानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाळणार का या प्रश्नावर आमदार गोरेंनी हे उत्तर दिले आहे. माण, खटावचे आमदार गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपवासिय झाले आहेत. मतदारसंघाच्या विकासासासाठीच आपण पक्ष बदलला असल्याबाबत त्यांनी अनेकदा जाहीरपणे सांगितले आहे.

Jaykumar Gore, Devendra Fadanvis
Maan : माण एमआयडीसीच्या स्थलांतरास उपमुख्यमंत्र्यांचा विरोध : आमदार गोरे

भाजपमध्ये जाण्यापूर्वीपासूनच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चांगले संबंध असल्याने त्यांच्या माध्यमातून मतदारसंघातील अनेक विकासकामे होण्यास मदत झाल्याचे कबुली आमदार गोरेंनी यापूर्वीही दिली आहेत. गत विधानसभा निवडणूक प्रचारा दरम्यान, श्री. फडणवीस यांनी आमदार गोरेंना मंत्रिपद देणार असल्याचे जाहीर वक्तव्य केले होते. आमदार गोरे निवडून आले, परंतू, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्याने अडचण निर्माण झाली होती.

Jaykumar Gore, Devendra Fadanvis
आमदार गोरेंचे स्टार चमकणार; माण तालुक्याला लाल दिवा मिळणार

गेल्या महिनाभरात राज्यात सत्तापालट होऊन शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. या बदलामुळे माणला मंत्रिपद मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस व आमदार गोरे यांची जवळीक पाहता याबाबत जनतेतून सकारात्मक चर्चाही होत आहेत. मंत्रीपदाबाबत बोलताना आमदार गोरे म्हणाले, ''माण खटावच्या जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठीच मी आमदार झालो आहे.

Jaykumar Gore, Devendra Fadanvis
रामराजेंनीच माण तालुक्याला पाण्यापासून वंचित ठेवलं...जयकुमार गोरे

दुष्काळी भागात पाणी आणण्यात मी यश मिळवलंय. जिहे कठापुरचे पाणीही लवकरच आंधळी तलावात येईल. म्हसवड एमआयडीसी सुद्धा इतरत्र कुठे जाणार नाही. शेती, रोजगार, उद्योग, शिक्षण, आरोग्य या प्रश्नातही आमूलाग्र सकारात्मक बदल घडवायचे आहेत. शिवाय इतर लोकाभिमुख अनेक विकासकामे पूर्ण करायची आहेत. त्यासाठी मंत्रिपद असावं किंवा नसावं हे माझ्यासाठी महत्त्वाचं नाही. माझ्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हेच माझं मंत्रिपद आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com