बॅंकेत ज्यांच्या शेजारी बसून चहा प्यायलो त्यांना संचालक करा : शिवेंद्रराजेंची मागणी

शिवेंद्रराजे shivendraraje Bhosale म्हणाले, आजपर्यंतच्या प्रचार सभांना कोणी हजर असाचे कोणी गैरहजर असायचे. पण पालकमंत्र्यांची दहशत एवढी आहे की आज सगळे संचालक झाडुन उपस्थित आहेत.
बॅंकेत ज्यांच्या शेजारी बसून चहा प्यायलो त्यांना संचालक करा : शिवेंद्रराजेंची मागणी
Balasaheb Patil, Sunil Mane, Shivendraraje Bhosalekarad reporter

सातारा : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत यावेळेस बँकेचे उपाध्यक्ष व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी डावलले आहे. त्यामुळे ते रिंगणात नाहीत. आजच्या कराडच्या सभेत शिवेंद्रसिंहराजेंनी आपल्या भाषणात सुनील मानेंचा मुद्दा उपस्थित करत मागील पाच वर्षे आम्ही दोघे जिल्हा बँकेत शेजारी बसून काम केले. एकत्र बसून चहा पिलो. त्यांच्याबाबतीत पालकमंत्र्यांनी काहीतरी मार्ग काढावा व त्यांना स्वीकृत संचालक करावे, अशी मागणी त्यांनी सहकारमंत्र्यांकडे केली.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनेलच्या कराड सोसायटी मतदारसंघातील उमेदवार सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रचारार्थ कराडमध्ये आयोजित सभेत आमदार शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी बँकेचे सर्व संचालकांसह बिनविरोध निवडून आलेले संचालक, आमदार उपस्थित होते.

Balasaheb Patil, Sunil Mane, Shivendraraje Bhosale
जिल्हा बॅंक हे तर निमित्त : शशिकांत शिंदेंचा `कार्यक्रम` करण्याचा मुहूर्त जुनाच !

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ''आजपर्यंतच्या प्रचार सभांना कोणी हजर असाचे कोणी गैरहजर असायचे. पण पालकमंत्र्यांची दहशत एवढी आहे की आज कराडला सगळे संचालक झाडुन उपस्थित आहेत. निवडणूक लढणारे व बिनविरोध झालेले असे १९ संचालक उपस्थित आहेत. म्हणजे पालकमंत्र्यांची दहशत किती आहे हे दिसते.'' मी कोरेगाव, खटाव, माणच्या सभांना गेलो नव्हतो. पण, कराडला सभेसाठी मी सकाळीपासून तयारी केली आहे.

Balasaheb Patil, Sunil Mane, Shivendraraje Bhosale
एका मंत्र्यांचे जिल्हा बँकेतील भवितव्य फडणवीस यांच्या आदेशावर ठरणार

जिल्हा बँकेत चांगली परिस्थिती असून सभासदांना सर्व माहिती आहे. आम्ही सर्वजण बँकेत संचालक आहोत, त्या प्रत्येकाचे सहकाराशी जवळचे नाते आहे. मला भाऊसाहेब महाराजांचा वारसा आहे, बाळासाहेब पाटील यांना पी. डी. पाटील यांचा वारसा आहे. या जुन्या लोकांनी सहकारात मोठे काम केले आहे. या जिल्ह्यात खऱ्या अर्थाने त्यांनी सहकार उभा केला, त्यांचा वारसा आम्ही पुढे नेत आहोत. तुमच्या सर्वांच्या विश्वासावर आगामी काळात बँकेची वाटचाल दमदार पद्धतीने चालेल याची ग्वाही देतो.

Balasaheb Patil, Sunil Mane, Shivendraraje Bhosale
कोणी कितीही गर्जना करू देत; जिल्हा बँकेत राष्ट्रवादीचेच पॅनेल येणार...

काही संचालक आपल्यासोबत पुढील पाच वर्षात असणार नाहीत. यामध्ये उपाध्यक्षांचा समावेश आहे. मागील पाच वर्षे आम्ही दोघे जिल्हा बँकेत शेजारी बसून काम करत होतो. बँकेत एकत्र बसून चहा पित होते. गप्पा गोष्टी चालायच्या मात्र, आता ते पुढील पाच वर्षे असणार नाहीत. यावर पालकमंत्र्यांनी उपाय करावा. तेच यातून मार्ग काढू शकतात. त्यांच्याच हातात त्यांचा विषय आहे. बाळासाहेब पाटील यांना माझी विनंती आहे. त्यांनी एवढ्यावेळेस निर्णय घेऊन सुनील मानेंना स्वीकृत संचालक करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in