Lonand APMC News : खंडाळ्याच्या पिचवर मकरंद आबाच चॅम्पियन : भाजप-सेना महायुतीला धोबीपछाड

NCP votes decreased यावेळी राष्ट्रवादीचे मताधिक्य घटल्याने त्यांच्यावर आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.
Makrand Patil, Lonand NCP activist
Makrand Patil, Lonand NCP activistsarkarnama

-रमेश धायगुडे

Lonand APMC News : लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत आमदार मकरंद पाटील makrand Patil यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीपुरस्कृत शेतकरी विकास पॅनलने १८ पैकी १७ जागा जिंकून पुन्हा एकदा वर्चस्व सिध्द केले. तर राष्ट्रवादीला शह देण्यासाठी एकत्र आलेल्या भाजप -सेना, काँग्रेस व अन्य पक्षाच्या महायुतीला केवळ एक जागा मिळाली आहे. त्यामुळे खंडाळ्याच्या पिचवर आमदार मकरंद पाटील चॅम्पीयन ठरले आहेत. निवडणूकीपुरते एकवटलेल्या विरोधकांनी मात्र त्यांच्याकडून धोबीपछाड व्हावे लागले आहे.

दरम्यान महायुतीने चांगले मताधिक्य मिळवले. मात्र विजयामध्ये त्याचे रुपांतर करता आले नाही. तर गेल्यावेळी पेक्षा यावेळी राष्ट्रवादीचे मताधिक्य घटल्याने त्यांच्यावर आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. विजयी सभेत आमदार मकरंद पाटील यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना तसे सांगितले.

तदारसंघनिहाय राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलचे विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते कंसात पुढील प्रमाणे : सोसायटी मतदार संघ (सर्वसाधारण ७ जागा) : सुनील संपत शेळके ( ३३९ ),सिद्धेश्वर दत्तात्रय राऊत ( ३३१ ),भानुदास दगडू यादव ( ३३० ),भगवान तात्याबा धायगुडे ( ३२६),शिवाजी दादा शेडगे ( ३१९),नारायण दादासो धायगुडे ( ३१४),यशवंत श्रीरंग चव्हाण ( ३०३)

Makrand Patil, Lonand NCP activist
Satara News : उदयनराजे हे साताऱ्याला लागलेले ग्रहण...शिवेंद्रराजेंचा घाणाघात

सोसायटी महिला राखीव मतदार संघ (दोन जागा) :वैशाली चंद्रकांत घाडगे ( ३४६) व उज्वला दिनकर मांढरे ( ३४०). सोसायटी इतर मागास प्रवर्गातून ३३७ मते मिळवत राजेंद्र यशवंत नेवसे हे विजयी झाले आहेत. तर भटक्या व विमुक्त जाती जमाती प्रवर्गातून विजय मारूती धायगुडे हे ३५८ माते मिळवून विजयी झाले. सोसयटी मतदार संघातील सर्वच्या सर्व ११ जागा राष्ट्रवादीच्या पॅनलने ८० मतांच्या फरकाने जिंकल्या आहेत.

Makrand Patil, Lonand NCP activist
Makrand Patil : महाबळेश्वरला स्ट्रॉबेरी संशोधन केंद्र मंजूर; मकरंद पाटलांचा पाठपुरावा

ग्रामपंचायत मतदार संघ ( सर्वसाधारण दोन जागा) संग्राम अप्पासाहेब देशमुख ( २७५) व साहेबराव किसन धायगुडे ( २४३) मते मिळवत विजयी झाले. ग्रामपंचायतीच्या अनुसूचित जाती प्रवर्गातून संजय अर्जुन कदम यांनी २९३ मते मिळवत विजय मिळवला. तर आर्थिक दृष्या दुर्बल घटक प्रवर्गातून सतिश मोरे हे बिनविरोध निवडून आले आहेत. येथे विजयी उमेदवारांनी ८६ मतांची आघाडी घेत विजय मिळवला आहे.

Makrand Patil, Lonand NCP activist
Satara News : सातारचे दोन्ही राजे शशिकांत शिंदेंच्या प्रेमात; महेश शिंदेंना शह देण्याचा प्रयत्न..

व्यापारी मतदार संघ ( दोन जागा) : अरुण गोविंदराव गालिंदे ( १८२) व जयेश सुरेशचंद्र शहा ( १५५) मते मिळवत विजयी झाले. येथे विजयी उमेदवारांनी ६३ मतांची आघाडी घेतली आहे. हमाल मापाडी मतदार संघातून भाजप - शिवसेना, कॉंग्रेस व अन्य पक्ष महायुतीचे शिवसेनेचे शिंदे गटाचे उमेदवार विश्वास सदाशिव शिरतोडे हे १८२ मते मिळवत विजयी झाले आहे. त्यांनी ७५ मतांची आघाडी घेतली.

Makrand Patil, Lonand NCP activist
Jayant Patil News : राष्ट्रवादीत भाकरी फिरणार; जयंत पाटलांच्या जागी 'या' तीन नावांची चर्चा!

दरम्यान, विजयानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकार्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिष भाजी करत विजय साजरा केला. तर आमदार मकरंद पाटील यांच्या उपस्थित खंडाळा येथे विजयी सभा झाली. त्यावेळी सर्व विजयी उमेदवारांचे आमदार मकरंद पाटील यांनी सत्कार केला. यावेळी तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष दत्तानाना ढमाळ, अॅड. शामराव गाढवे,उदय कबुले,राजेंद्र तांबे, मनोज पवार यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Makrand Patil, Lonand NCP activist
Sharad Pawar : शरद पवारांच्या काही गोष्टी मी गांभीर्याने घेत असतो, असं का म्हणाले मुख्यमंत्री ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com