सोलापूर राष्ट्रवादीत मोठे फेरबदल : नव्या नियुक्तांमध्ये कोठेंची भूमिका महत्वाची ठरणार

नेमकी कोणाची उचलबांगडी होणार अन्‌ त्या ठिकाणी नव्यांना की जुन्यांनाच पुन्हा संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सोलापूर राष्ट्रवादीत मोठे फेरबदल : नव्या नियुक्तांमध्ये कोठेंची भूमिका महत्वाची ठरणार
Mahesh KotheSolapur

सोलापूर : सोलापूर (solapur) महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या दृष्टीने शहर राष्ट्रवादी काँग्रेसमधील (ncp) पदाधिकाऱ्यांमध्ये अदलाबदल होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. शहराध्यक्ष, कार्याध्यक्ष व युवक अध्यक्षाची संधी इतरांना मिळू शकते. ‘महापौर आमचाच’ हे वास्तवात उतरविण्यासाठी हे बदल होतील, असे पक्षातील एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. (Major changes in Solapur NCP : Mahesh Kothe's role will be important in new appointments)

राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवार यांना पक्षाने प्रदेश सचिवपदी बढती दिली आहे. तत्पूर्वी, शहर राष्ट्रवादीच्या युवक अध्यक्षांचे वयदेखील त्या पदासाठी संपुष्टात आले आहे. दुसरीकडे, मागील सात वर्षांपासून शहराचे पद सांभाळणारे बदलून त्या ठिकाणी दुसऱ्याला संधी मिळावी, अशीही मागणी केली जात आहे. महेश कोठेंच्या (Mahesh kothe) नेतृत्वाखाली आगामी महापालिका निवडणूक होणार असल्याचे निश्चित आहे. त्यामुळे कोठेंचा निवडीत हस्तक्षेप असणार नाही, पण इच्छुकांचे नाव अंतिम करण्यासाठी त्यांचा होकार महत्त्वाचा ठरणार आहे.

Mahesh Kothe
...मोदीसाहेब माझी विशेष काळजी घेत आहेत : राजू शेट्टींचे वक्तव्य!

शिवसेनेच्या निवडी ज्या पद्धतीने ‘मातोश्री’वरून होतात, त्याच पद्धतीने आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, ज्येष्ठ नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील निवडी ‘राधाश्री’वरून होतील, असेही बोलले जात आहे. त्यामुळे अनेकजण त्यांची भेट घेऊन इच्छा व्यक्त करीत असल्याचीही चर्चा आहे. पण, महापालिकेत सातत्याने उपमहापौरपद मिळवलेली राष्ट्रवादी मागील निवडणुकीत केवळ चार जागांवरच विजय मिळवू शकली होती. आता मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस, शिवसेनेच्या तुलनेत सर्वाधिक जागा मिळवून महापालिकेवर पहिल्यांदाच राष्ट्रवादीचा महापौर बसविण्यासाठी हा बदल करावाच लागेल, असाही पक्षात मतप्रवाह आहे.

Mahesh Kothe
एकनाथ शिंदेंसह संजय राठोड मुख्यमंत्र्यांच्या भेटीला : मंत्रिमंडळात पुन्हा दिसण्याची शक्यता!

नेमकी कोणाची उचलबांगडी होणार अन्‌ त्या ठिकाणी नव्यांना की जुन्यांनाच पुन्हा संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तत्पूर्वी, जुबेर बागवान यांच्यासह आणखी काही पदाधिकाऱ्यांचे पक्षासाठी योगदान मोठे राहिले आहे. त्यामुळे त्यांनाही कुठेतरी संधी द्यावी लागणार आहे. त्यांचे पुनर्वसन कुठे होणार, याचीही उत्सुकता आहे.

Mahesh Kothe
शशिकांत शिंदेंचा पराभव पवारसाहेबांच्या जिवाला लागला : श्रीनिवास पाटील

इच्छुकांची भाऊगर्दी

दिलीप कोल्हे, विद्या लोलगे, जुबेर बागवान, आनंद मुस्तारे, मल्लेश बडगू हे शहरातील विविध पदांसाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. त्यातील काहीजण शहराध्यक्षपदासाठी तर काहीजण कार्याध्यक्ष होण्यासाठी इच्छुक आहेत. काहींनी शहर युवक अध्यक्ष होण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केल्याचे बोलेले जात आहे. इच्छुकांमध्ये आगामी काळात आणखी वाढ होऊ शकते, असाही अंदाज वर्तविला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.