महेश शिंदेंचे वजन वाढले : म्हणाले, ``कलेक्टरची एका झटक्यात बदली केली!``

Eknath Shinde हे मुख्यमंत्री होताच महेश शिंदे यांचा दबदबा वाढला..
MLA Mahesh Shinde
MLA Mahesh Shindesarkarnama

कोरेगाव : कोरेगावातील महामार्ग, नाट्यगृह, अभ्यासिका, भाजी मंडई आदी प्रकल्प हाती घेतले असून त्यामध्ये प्रशासकीय पातळीवर खोडा घालण्याचा प्रयत्न झाला. शासकीय जमिनी नगरपंचायतीकडे वर्ग करण्यात खोडा घालणार्‍या जिल्हाधिकाऱ्यांची एका झटक्यात बदली करुन टाकली. बदलीनंतर एकाच दिवसांत महसूल खात्याने नगरपंचायतीकडे जमीन वर्ग केली, अशी माहिती कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी सांगितली अन्‌ जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीचा उलगडा झाला.

कोरेगाव नगरपंचायतीच्या वतीने रेल्वे स्टेशन आणि औद्योगिक वसाहतीमधील जलशुध्दीकरण प्रकल्पाचे लोर्कापण, स्मशानभूमीकडे जाणार्‍या ट्रिमिक्स कॉंक्रीटीकरण रस्ता व भुयारी गटार योजनेचा प्रारंभ आमदार महेश शिंदे यांच्या उपस्थितीत व मान्यवरांच्या हस्ते झाला. त्यानंतर प्रियांका मल्टीपर्पज हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन महेश शिंदे बोलत होते.

MLA Mahesh Shinde
ठाण्याची दाढी योग्य टायमिंग आल्यावर कार्यक्रम करते... महेश शिंदे

महेश शिंदे म्हणाले, नगरपंचायतीत नागरिकांनी स्पष्ट बहुमत दिले आहे. नागरिकांनी टाकलेला विश्‍वास सार्थ ठरवणार आहे. विकासकामे करताना शहर व मतदारसंघात कारखानदारी आणणार असून, रोजगार निर्मितीवर भर देणार आहे. कोरेगावातील महामार्ग, नाट्यगृह, अभ्यासिका, भाजी मंडई आदी प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यामध्ये प्रशासकीय पातळीवर खोडा घालण्यात येत होता.

MLA Mahesh Shinde
Koregaon : राज्यात शिंदेशाही; बारामतीकरांचे राज्य आता संपले... महेश शिंदे

जो आडवा येतो, त्याला आडवा करण्याची ताकद आमदार शिंदे ठेवतो. शासकीय जमिनी नगरपंचायतीकडे वर्ग करण्यात खोडा घालणार्‍या जिल्हाधिकाऱ्यांची एका झटक्यात बदली करुन टाकली. बदलीनंतर एकाच दिवसांत महसूल खात्याने नगरपंचायतीकडे जमीन वर्ग केली, असेही आमदार शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले.

MLA Mahesh Shinde
अजित पवार म्हणतायेत; घोड कुठं पेंड खातयं, मंत्रीमंडळाचा विस्तार का होत नाही ?

कोरेगाव नगरपंचायतीत नगरविकास आघाडीची सत्ता असून, १७ पैकी १३ सदस्य विजयी झाले आहेत. नगराध्यक्षा दीपाली बर्गे यांचे पती महेश बर्गे यांनी प्रास्ताविकात माजी नगराध्यक्ष रेश्मा कोकरे व माजी उपनगराध्यक्ष मंदाताई बर्गे यांनी केलेल्या टिकाटिपण्णीवर भाष्य केले होते, त्याचा धागा पकडून आमदार शिंदे यांनी विरोधकांच्या टीकेला जास्त महत्त्व देत बसायचे नसते, आपण आपले काम करायचे असते. सर्वसामान्य जनतेचा विकास करण्यासाठी आपल्याला जनतेने निवडून दिले आहे, असेही स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in