Koregaon : भूलथापांवर निवडून येणाऱ्यांना जनतेने घरी बसवले : महेश शिंदे

Nigadi Wandan निगडी वंदन (ता. सातारा) येथे विविध विकासकामांच्या भूमिपूजन समारंभ कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज घोरपडे, संदीप शिंदे उपस्थित होते.
MLA Mahesh Shinde
MLA Mahesh Shindesarkarnama

Satara News : भूलथापा देऊन, फसवणूक करून निवडून येणाऱ्यांना जनतेने वेळीच धडा देत घरी बसविले. केवळ लोकांची दिशाभूल करून निवडून येता येते; पण शाश्वत विकास करता येत नाही, असे मत कोरेगावचे (koregaon)आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) यांनी निगडी वंदन येथे व्यक्त केले.

निगडी वंदन (ता. सातारा) येथे विविध विकासकामांच्या भूमिपूजन समारंभ कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज घोरपडे, संदीप शिंदे उपस्थित होते. आमदार महेश शिंदे म्हणाले, निगडी वंदन हे गाव लोकसंख्येने लहान असले, तरी येथील नागरिक सुज्ञ आहेत. पण या अगोदरच्या आमदारांनी लोकांना विकासकामांचा डोंगर उभा करण्याचे आश्वासन दिले होते.

मात्र, त्यांनी लोकांची दिशाभूल करत गावाला मूलभूत विकासापासून दूर ठेवण्याचे पाप केले असल्याने आज सर्वसामान्य जनतेने अशा भूलथापांनी मत मिळवणाऱ्यांना मतपेटीतून उत्तर देत घरी बसविले. यापुढे आपण मनोज घोरपडेंच्या साथीने या गावासाठी व पर्यायाने संपूर्ण मतदारसंघासाठी विविध विकासात्मक योजना मार्गी लावण्यास कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

MLA Mahesh Shinde
Satara : बाळासाहेबांची शिवसेना, भाजप एकत्र बसून पराभवाची कारणे शोधणार : शंभूराज देसाई

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com