रस्त्याच्या निकृष्ठ कामावरून महेश शिंदे भडकले; ठेकेदाराला धरले धारेवर....

साताऱ्यात Satara देगाव Degaon ते एमआयडीसी MIDC रस्त्याचे Road निकृष्ट काम केल्याने शिवसेना Shivsena आमदार MLA महेश शिंदे Mahesh shinde संतप्त get agressive स्वतः रस्त्याची पाहणी करून ठेकेदाराला सर्वांसमोर धरले धारेवर
MLA Mahesh Shinde
MLA Mahesh Shindesarkarnama

सातारा : औद्योगिक वसाहतीत जाणाऱ्या देगाव रोडच्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने शिवसेना आमदार महेश शिंदे चांगलेच आक्रमक झाले होते. त्यांनी या कामाची जागेवर जाऊन पाहणी केली. यावेळी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी चांगलेच धारेवर धरले.

कोरेगाव मतदारसंघातील सातारा औद्योगिक वसाहतीत जाणाऱ्या देगाव रस्त्याचे काम आमदार महेश शिंदे यांच्या फंडातूनच मंजूर झालेले आहे. या बाराशे मीटर रस्त्यासाठी तब्बल सहा कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेले आहे. मात्र, या कामाचा दर्जा चांगला नसल्याचे आमदार महेश शिंदे यांना नागरीकांनी लक्षात आणून दिले.

MLA Mahesh Shinde
मदन भोसलेंना शेतकऱ्यांनी उसाचं टिपरू दाखवलं का? महेश शिंदे म्हणतात, 'सत्य असू शकेल!'

हे समजल्याने त्यांनी इतक्या मोठ्याप्रमाणात निधी उपलब्ध करूनही हे काम निकृष्ट होत असल्याने संताप व्यक्त केला. रस्त्याचे काम करणाऱ्या इंजिनिअरचे आणि ठेकेदारांच साटेलोटे असल्याचा आरोप करत संबंधित इंजिनिअर आणि ठेकेदारांना कारणे दाखवा नोटीस देण्याची मागणी त्यांनी केली आहे. यावेळी स्थानिक नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. गेली 30 वर्षांपासून हा रास्त खराब असल्याने या रस्त्याचे काम दर्जेदार करण्याची मागणी नागरिकांनी आमदार महेश शिंदे यांच्याकडे केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com