आमदार देशमुखांचे चिरंजीव कोठेंच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरणार?

कोठे विरुद्ध देशमुख ही विधानसभा लढतीची लिट्‌मस टेस्ट सोलापूकरांना पालिका निवडणुकीत बघायला मिळणार आहे.
आमदार देशमुखांचे चिरंजीव कोठेंच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरणार?
Mahesh Kote-Kiran deshmukhSarkarnama

सोलापूर : सोलापूर महापालिका निवडणुकीची राष्ट्रवादी काँग्रेसची संपूर्ण धुरा माजी महापौर महेश कोठे यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या दौऱ्यात तसे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. एकीकडे राष्ट्रवादी ताकद देत असताना भारतीय जनता पक्षाचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी मात्र कोठे यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात रोखण्याची रणनीती आखली आहे, त्याचा एक भाग म्हणून विधानसभा निवडणुकीच्या अगोदर होणाऱ्या महापालिका निवडणुकीत महेश कोठे यांच्या विरोधात देशमुख यांचे चिरंजीव नगरसेवक डॉ. किरण देशमुख यांना उतरविण्याची शक्यता आहे. आमदार देशमुख विरोध कोठे यांच्या विधानसभेच्या लढतीअगोदर पालिका निवडणुकीत त्याची लिट्‌मस टेस्ट सोलापूकरांना बघायला मिळणार आहे. (Solapur Municipal Corporation's election Mahesh Kothe against Dr. Kiran Deshmukh will contest elections)

सोलापूर महापालिकेच्या प्रभाग 10 आणि 11 हा महेश कोठे यांचा बालेकिल्ला मानला जातो. या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी आमदार विजयकुमार देशमुख यांनी खूप आगोदरपासून तयारी सुरु केली आहे. या भागातील कार्यकर्त्यांचा सन्मान असो की विकास निधी देण्याचा विषय असो, या भागातील लहान-मोठा कार्यक्रम असो की इतर अडचणी त्या सोडविण्यासाठी आमदार देशमुख यांची यंत्रणा कायम तत्पर असते.

Mahesh Kote-Kiran deshmukh
महेश कोठेंना बालेकिल्ल्यातच अडकविण्याचा विजयकुमार देशमुखांचा मास्टर प्लॅन

महापालिकेच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रमुख चेहरा आणि मोहरा हे महेश कोठे असणार आहेत. त्यांच्या विरोधात आमदार विजयकुमार देशमुख यांचे चिरंजीव नगरसेवक डॉ. किरण देशमुख यांना मैदानात उतरविले जाण्याची दाट शक्‍यता आहे. विधानसभेच्या 2024 च्या निवडणुकीत सोलापूर उत्तर मतदार संघात आमदार विजयकुमार देशमुख विरुध्द महेश कोठे हा सामना पाहण्याअगोदर महेश कोठे विरुध्द डॉ. किरण देशमुख हाच सामना रंगण्याची दाट शक्‍यता आहे.

आमदार देशमुख यांच्या गटाकडून त्या दृष्टीने डावपेच टाकायला सुरुवात झाली आहे. त्यासाठी येत्या २० ऑक्‍टोबरच्या दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कोठे यांचा बालेकिल्ला असलेल्या विडी घरकुल परिसरात भाजपकडून मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, विविध विकासकामांचे उद्‌घाटन होणार आहे. माजी महापौर महेश कोठे यांना त्यांचा बालेकिल्ला असलेल्या विडी घरकुल परिसरात अडकवून ठेवण्याचा डाव भाजपकडून टाकण्यात येत आहे. त्या दृष्टीने भाजपकडून डावपेच आखले जात आहेत.

Mahesh Kote-Kiran deshmukh
राणेंचा शिवसेनेला जोरदार धक्का : पंचायत समितीच्या सदस्यांचा भाजपत प्रवेश

भाजपचे 2017 च्या निवडणुकीमध्ये 49 नगरसेवक विजयी झाले होते. त्यातील जवळपास 33 नगरसेवक हे आमदार विजयकुमार देशमुख गटाचे आहेत. त्यामध्ये आता उघडणपणे बहुजन समाज पक्षाच्या एका नगरसेवकाची भर पडली आहे. सोलापूर शहर उत्तरमधील सर्वच्या सर्व जागा एकहाती जिंकण्यासाठी आमदार देशमुख यांनी बूथ पातळीवरील यंत्रणा अधिक भक्कम केली आहे. शिवसेनेकडून 2017 मध्ये विजयी झालेले राजकुमार हंचाटे आणि अनुराधा काटकर हे सध्या देशमुख यांच्या गटात असल्याने भाजपची आणखी ताकद वाढली आहे.

Related Stories

No stories found.