Maan News: वर्षभरात 'महाविकास'चीच सत्ता राज्यात येणार...रवींद्र धंगेकर

Ravindra Dhangekar: कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर हे निवडणुकीनंतर आज पहिल्यांदाच माण तालुक्यात आले होते.
Ravindra dhangekar In Maan
Ravindra dhangekar In Maansarkarnama

Maan News : माण तालुक्याशी माझी नेहमीच जवळीक राहिली असून माझ्या विजयात माणवासीयांचा मोठा हातभार आहे. येत्या वर्षभरात महाविकास आघाडीचीच Mahavikas Aghadi सत्ता राज्यात येणार असून यावेळी माणमधून प्रभाकर देशमुखांचा विजय हुकणार नाही, असा विश्वास कसबा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर Ravindra Dhangekar यांनी व्यक्त केला.

बहुचर्चित कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर हे निवडणुकीनंतर आज पहिल्यांदाच माण तालुक्यात आले होते.राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांच्या लोधवडे येथील निवासस्थानी त्यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी राष्ट्रवादीच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

पत्रकारांशी संवाद साधताना धंगेकर म्हणाले, माण तालुक्यातील लोक माझ्याही मतदारसंघात आहेत. माझ्या निवडणुकीत माणच्या माणसाचं घट्ट नातं दिसून आले. वेगळ्या टोकाला पोचलेल्या या निवडणुकीत प्रभाकर देशमुख यांनी वेळोवेळी केलेली मदत मोलाची ठरली. माझ्या विजयात त्यांनी घातलेली भर कधीही विसरू शकणार नाही.

Ravindra dhangekar In Maan
Sanjay Shirsat On Ncp News : राष्ट्रवादी हा घात करणारा पक्ष, ते सत्तेशिवाय राहूच शकत नाहीत...

महाविकास आघाडी मोठ्या ताकदीने काम करत आहे. प्रशासकीय सेवेत असल्यापासून प्रभाकर देशमुख यांनी माणच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यामुळे येत्या निवडणुकीत देशमुख यांचा विजय हुकणार नाही. जनहिताच्या स्वभावामुळे जनता त्यांना डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास व्यक्त केला.

धंगेकर म्हणाले, प्रभाकर देशमुख हे तळागाळातील लोकांसाठी काम करत असून त्यांना समाजभान आहे. महाविकास आघाडीने माण तालुक्यात शेती व पाणी याबाबत खूप योगदान देऊन काम केलं आहे. त्यामुळेच बागायती क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत आम्ही नक्कीच विजयी होऊ.

Ravindra dhangekar In Maan
Prabhakar More Joins NCP : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याची राजकारणात एन्ट्री; हाती बांधलं 'घड्याळ'!

सर्वसामान्यांची उंची वाढविण्याचे काम करणाऱ्या धंगेकरांच्या विचाराशी घट्ट नाते असून त्याच विचाराने आम्ही काम करत असल्याचे सांगून प्रभाकर देशमुख म्हणाले, सर्वसामान्यांशी थेट जोडले गेलेले हे नेतृत्व भविष्यात अधिक मोठे होईल. (Latest Maharashtra News)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com