महाराष्ट्रात सामाजिक, धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम महाविकास आघाडी करतेय...

राज्याचे माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrasekhar Bawankule ) आज शिर्डीत साई दर्शनासाठी आले होते.
महाराष्ट्रात सामाजिक, धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम महाविकास आघाडी करतेय...
Chandrashekhar BawankuleSarkarnama

अहमदनगर - राज्याचे माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrasekhar Bawankule ) आज शिर्डीत साई दर्शनासाठी आले होते. या प्रसंगी त्यांनी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधताना महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. ( Mahavikas is leading the work of creating social and religious rift in Maharashtra ... )

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, भावना व्यक्त केल्या तर भावनेचा आदर सरकारने करायचा असतो. सरकार यासाठीच असते. 12 कोटी जनतेत कोणी कोणत्याही पक्षाचा असुद्या त्याचा मान-सन्मान करणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. मला वाटते या संस्कृतीला छेद बसला आहे. ही संस्कृती आता व्यक्तिगत राजकारणाकडे चालली आहे. म्हणूनच महाराष्ट्राला आज हे दिवस आले आहेत. महाविकास आघाडी सरकार विरोधात कोणी बोलले तर त्याला दडपशाही पद्धतीने वागवितात. राणांपेक्षा वाईट मिटकरी बोलले. महाराष्ट्रातील सामाजिक व धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम महाविकास आघाडी सरकार करत आहे. एका दिवसात महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण चांगले होऊ शकते. त्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे बावनकुळे यांनी सांगितले.

Chandrashekhar Bawankule
Video: नागपूरातील पाणी प्रश्नावर भाजप संतप्त; चंद्रशेखर बावनकुळे

बावनकुळे पुढे म्हणाले की, राज्यात अस्थिर परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र हे थांबविता येऊ शकते, अशी परिस्थिती निर्माणच होऊ नये ही जबाबदारी राज्य सरकारची असते. राज्य सरकारला विनंती आहे, अशी अस्थिर परिस्थिती राज्यामध्ये कोणत्याही सरकारने येऊ देऊ नये. त्यांना सद्बुद्धी देवो. महाराष्ट्राच्या इतिहास व संस्कृतीनुसार पायंडा आहे की, सर्वांना सोबत घेऊन काम केले जाते. विरोधकांनाही आपलेसे करून राज्य पुढे नेने ही संस्कृती सर्वांनी जपली पाहिजे, अशी साईबाबाला मागणी केली आहे.

राज्याच्या तीनही वीज कंपन्यांत एवढी क्षमता आहे की राज्यात भारनियमन होऊ शकत नाही. मात्र भ्रष्टाचार मुक्त प्रशासन द्यावे लागेल. तीनही कंपन्यांनी योग्य प्लानिंग करावे लागेल आणि प्रशासनालाही नियोजन करावे लागेल. आता तीनही गोष्टी गेल्या आहेत. तीनही कंपन्यांतील आपसातील संवाद गेला आहे. जानेवारी ते मार्च मध्ये केंद्र सरकारच्या कंपन्यांनी 22 दिवसांचा कोळसा घेऊन जा रेल्वे व कोळसा दोन्ही द्यायला तयार झाले मात्र राज्य सरकारकडे कॅशप्रो नव्हता. 18 हजार कोटी रुपयांच्या वर रकमा वित्त विभागाने थांबविल्या. ऊर्जा मंत्री व वित्तमंत्र्यांच्या भांडणामध्ये या कंपन्यांना पैसा मिळाला नाही. त्यामुळे ते जानेवारी ते मार्च दरम्यान नियोजन करू शकले नाहीत. म्हणून त्याचा फटका आता मे, जून, जुलैमध्ये बसणार. मे, जून, जुलैमध्ये नियोजन केले नाही तर फटका पावसाळ्यात बसणार, असे भाकितही बावनकुळे यांनी केले.

Chandrashekhar Bawankule
Video: 'त्या' पत्राचा अर्थ काय ?; चंद्रशेखर बावनकुळे

दोन मंत्र्यांचा वाद

देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये योग्य नियोजन असायचे. सामुहिक जबाबदारी असायची. देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार व मी बसून प्लानिंग करायचो. राज्य हे भारनियमन मुक्त केले. 25 हजार मॅगावॅटचे वीज वहन केली. कधी ट्रान्सफार्मर फेल झाला नाही. कुठेही भारनियमन होऊ दिले नाही. 45 लक्ष शेतकऱ्यांना वीज दिली. 28 हजार कोटी रुपयांची वीज दिली. कधीही वीज जोडणी तोडण्यासाठी महावितरण कर्मचारी शेतात गेले नाहीत. मोठ्या प्रमाणात पायाभूत सोयी सुविधांचा विकास केला. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये घडले मग येथे का बिघडले. कारण मोठ्या प्रमाणात ताळमेळीचा अभाव आहे. दोन मंत्र्यांतील वाद आहे. 500 रुपयांसाठी गरिबांची वीज जोडणी तोडली जाते. दुसरीकडे 18 हजार कोटी थकीत ठेवता. मला या गोष्टीची चिंता आहे की शेतकऱ्यांची जनतेची लूट चालविली आहे. महावितरण ग्राहकांकडून दुप्पट अनामत रक्कम वसूल करत आहे. जानेवारी ते मार्च दरम्यान महागडी वीज खरेदी करण्यात आली. महाजनकोचे प्रकल्प बंद ठेवले. आजही अडीच हजार मॅगावेटचे प्रकल्प बंद आहेत. बाहेरून वीज खरेदी सुरू आहे. वीज खरेदी भ्रष्टाचार सुरू आहे. 25 टक्के दरवाढ केली. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात ही दरवाढ कधीच झाली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Chandrashekhar Bawankule
नगर महापालिका अस्तित्त्वात नसलेल्या जागेवर 15 वर्षे आकारत होती घरपट्टी

ही जबाबदारी महाविकास आघाडीची

राज्य एवढे चांगले असताना राज्याच्या तीनही कंपन्या सक्षम असताना आपण शेतकऱ्यांकडून पैसे न घेता वीज घेऊ शकतो. इतकी चांगली परिस्थिती असताना हे राज्य अंधारात का गेलं. याची जबाबदारी महाविकास आघाडी सरकारची आहे. लोक सहन करण्याच्या पलिकडे गेले आहेत. शेतकरी हैराण आहेत. दोनच तास शेतकऱ्यांना वीज मिळत आहे. काही ठिकाणी चार तास वीज मिळत आहे. आता नक्षली व आदिवासी भागात भारनियमन सुरू झाले असल्याचे, बावनकुळे यांनी सांगितले.

...तर मी पूर्ण व्यवस्था केली असती

राज्याच्या मुख्यमंत्र्यांना साई मंदिरातून माझी विनंती आहे की, सरकारमधील सर्व मंत्री आमदार, खासदार यांनी संयम ठेवून सरकार चालवावे लागते. एकीकडे आमदार अमोल मिटकरी काही बोलतात. दुसरीकडे राणाने सांगितले की मला हनुमान चालिसा म्हणायचा आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस कोणत्याही कार्यकर्त्याला माझ्या घरासमोर हनुमान चालिसा म्हणायचे असते तर मी त्याची पूर्ण व्यवस्था केली असती. नाष्टा-पाणी, जेवणाची व्यवस्था केली असती. टाळ-मृदुंग दिले असते. हनुमान चालिसा म्हणायला दिले असते. एका मिनिटात हे होऊ शकते. मग कशाला अशांतता पसरवायची. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना असे वातावरण पाच वर्षांत निर्माण झाले नव्हते, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

Chandrashekhar Bawankule
...म्हणून थोरातांच्या कारखान्यात विखे होते चेअरमन

राष्ट्रपती राजवटीची मागणी नाही

सध्या राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणे योग्य नाही. राज्यात दोन जिल्ह्यात गोळीबार झाले. त्यांच्याच मंत्र्याला धमकी येते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घरात लोक जातात. पोलिसांना माहिती नाही. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अनाचार, दुराचार सुरू आहे. पोलिस वसुली करत आहेत. प्रत्येक गावात मटका सटका, दारू, वाळू चोरी सुरू आहे. खून होत आहेत. खुले आम गोळीबार सुरू आहे. राज्याचा एकंदरीत आढावा घेतल्यास लोकांना भीती वाटत आहे. पूर्वी उत्तर प्रदेशामध्ये जी स्थिती होती ती स्थिती आता महाराष्ट्रात निर्माण होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने याकडे लक्ष घातले पाहिजे. जनतेतून सर्वेक्षण करा 70 टक्के लोक म्हणतील की महाविकास आघाडी सरकार नको. दिवसभर विकासाचा विषय घेण्या ऐवजी राजकीय विषय घेत आहेत.

राज्यातील मंत्री हे फक्त त्यांच्या मतदारसंघापुर्ते झाले आहेत. राज्यातील मंत्री, पालकमंत्री आपल्या मतदार संघापुर्ते काम पाहत आहेत. जिल्हा व राज्य म्हणून कोणीही सामुहिक जबाबदारी घेत नाही. महाराष्ट्रातील शेकडो विकासाचे विषय प्रलंबित आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचा विकास थांबला आहे. राज्यकर्त्यांनी राजकारण सोडून महाराष्ट्राचा विकास पाहिला पाहिजे. संजय राऊतांना विनंती आहे की, राज्यातील वातावरण खराब करू नका. लोकांना डिवचण्याचे काम करू नका. सकाळपासून डिवचण्याचे काम करता. तुम्ही विकासाचे का बोलत नाही. संजय राऊत विकासावर बोलत नाहीत. ते मुख्यमंत्र्यांनी काय काम केलं जनतेसाठी काय कामे करत आहेत हे प्रसारमध्यमांतून सांगत नाहीत. जनतेला भ्रमात ठेवण्यासाठी संजय राऊत यांची नेमणूक आहे, असा टोलाही बावनकुळे यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.