Satara : सातारा पालिकेत दीपक पवारांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे पॅनेल

लवकरच शरद पवार Sharad Pawar यांच्याबरोबर एक बैठक Meeting घेऊन सातारा शहरांमध्ये Satara City भव्य मेळावा Melava होणार आहे, अशी दीपक पवार Deepak Pawar यांनी माहिती दिली.
Udayanraje Bhosale, Deepak Pawar, Shivendraraje Bhosale
Udayanraje Bhosale, Deepak Pawar, Shivendraraje Bhosalesarkarnama

सातारा : समाजातील सर्व घटकांना एकत्र घेऊन सातारा शहराचा खुंटलेला विकास जर संपवायचा असेल तर दीपक पवार हे एकमेव नेतृत्व आहे, की जे या शहरांमध्ये सामान्य जनतेला न्याय देईल. ते सातारा शहराचा विकास करतील असा माझा विश्वास आहे. त्यामुळे दीपक पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे पॅनेल सातारा पालिकेला उभे केले जाईल, अशी माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली.

राष्ट्रवादीचे नेते अजित दादा पवार यांची आज जावलीचे नेते दीपक पवार यांनी पुणे येथील बारामती होस्टेल या ठिकाणी भेट घेतली. यावेळी सातारा पालिकेच्या निवडणुकीसंदर्भात बैठक होऊन प्रदीर्घ चर्चा झाली. सातारा शहराच्या संदर्भामध्ये त्याचबरोबर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीबाबत देखील चर्चा झाली. लवकरच सातारा शहरांत एकत्रित बैठक घेण्याविषयी वेळ निश्चित केली जाणार आहे.

आगामी काळात सातारा शहरांत सामान्य जनतेची होत असलेली मुस्कटदाबी विकासाच्या फसव्या घोषणा यामुळे जनता त्रस्त आहे, असे सांगून दीपक पवार म्हणाले, सातारा शहर नगरपालिकेत स्वच्छ चारित्र्याचे व सामान्य कुटुंबातील जनतेची नाळ असलेले उमेदवार उभे करणार आहे. लवकरच शरद पवार साहेबांच्या बरोबर एक मीटिंग घेऊन सातारा शहरांमध्ये भव्य मेळावा होणार आहे, अशी दीपक पवार यांनी माहिती दिली.

Udayanraje Bhosale, Deepak Pawar, Shivendraraje Bhosale
सातारा पालिका निवडणूकीत महाविकासचा फॉर्मूला; राष्ट्रवादी ताकदीने उतरणार : शशिकांत शिंदे

सातारा शहरातील अनेक लोक त्याबरोबर विविध पक्षांचे व संघटनांचे प्रमुख दीपक पवारांना भेटत आहेत. नगरपालिकेच्या विविध वार्डमधील इच्छुक उमेदवार देखील भेट घेत आहेत. परंतु, सातारा शहरांत एक खुला मेळावा घेऊन चित्र स्पष्ट करणार आहे. सध्या देशामध्ये (नफरत तोडो, भारत जोडो) त्याच प्रकारे सातारा शहरांमध्ये आपल्याला पॅनेल उभे करावे लागणार आहे.

Udayanraje Bhosale, Deepak Pawar, Shivendraraje Bhosale
साहेब, तुम्हीच मला आमदार करू शकता : दीपक पवार  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in