'दोन वर्षांतील नाकर्तेपणा लपविण्यासाठी महाविकास आघाडीतील मंत्री टिव्हीवर'

महाराष्ट्रात ( Maharashtra ) सध्या भाजप ( BJP ) व महाविकास आघाडीतील ( Mahavikas Aghadi ) नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यात आता भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( MP Dr. Sujay Vikhe Patil ) यांची भर पडली आहे.
Sujay Vikhe Patil
Sujay Vikhe PatilSarkarnama

अहमदनगर : महाराष्ट्रात सध्या भाजप व महाविकास आघाडीतील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यात आता भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची भर पडली आहे. खासदार डॉ. विखे पाटील यांनी महाविकास आघाडीतील मंत्र्यांची वक्तव्ये टिव्हीवर दाखवणे बंद करा असा सल्लाच खासगी वृत्तवाहिन्यांना दिला आहे. 'Mahavikas Aghadi Minister on TV to hide two years of negativity'

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे माजी आमदार (स्व.) माधवराव निऱ्हाळी खुले नाट्यगृह व (स्व.) लोकनेते गोपीनाथ मुंडे जॉगिंग पार्कचा लोकार्पण सोहळा भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाला. त्या प्रसंगी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर जोरदार टीका केली.

Sujay Vikhe Patil
सुजय विखे विरुद्ध निलेश लंके या लढाईच्या सेमीफायनलची तयारी जोरात

खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मंत्री नवाब मलिक यांच्यावर नाव न घेता टीका केली. ते म्हणाले, सध्या महाराष्ट्रातील परिस्थिती पाहून फार वाईट वाटत आहे. सकाळी टिव्ही चालू केला की एक मंत्री टिव्हीवर हजर दिसतो. तो दाढी करत नाही. त्यानी आंघोळ केली का हे कळत नाही. तो खरच झोपायला जातो की तिथेच खुर्चीवर झोपतो याचीही माहिती मिळत नाही. कारण, आपण रात्री झोपायला जाईपर्यंत तो खुर्चीवरच असतो आणि सकाळी उठून टिव्ही लावला तरी तो खुर्चीवरच सापडतो.

अशा पद्धतीने राज्यातील मंत्री टिव्हीवर आल्यानंतर आम्हाला अपेक्षा आहे, की राज्यातील एसटी महामंडळात जे कर्मचारी कामाला आहेत. ते उपोषणाला बसले आहेत. शेवगाव, पाथर्डी तालुक्यात दोन एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली. राज्यात 10 ते 15 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. त्या संदर्भात मंत्री बोलत नाहीत. शेवगाव व पाथर्डी तालुक्यात अतिवृष्टी झाली. शेत उद्धवस्त झाले. रस्ते फुटले. शेतकऱ्यांना नुकसानीचे अनुदान आले नाही. त्यावर मंत्री बोलत नाहीत. पण शेतीच्या उत्पन्ना बाबतीत त्यांना काही माहिती नाही. मात्र त्यांना माहिती आहे की गांजा किती रुपयाला मिळतो. अफिम किती रुपयांना आहे. त्यांच्या घरात त्याची विक्री चालते. त्यांच्या घरात त्याचा साठा सापडतो, अशी खासदार विखेंनी टीका केली.

Sujay Vikhe Patil
खासदार सुजय विखे यांची गुगली... तर आपण पुन्हा एकत्र येऊ!

खासदार विखेंनी सांगितले की, भाजपच्या एखाद्या कार्यकर्त्याच्या घरी छापा मारला, गोपिनाथ मुंडेंच्या एखाद्या कार्यकर्त्याच्या घरी छापा मारला तर कांदा, सोयाबीन, तूर सापडेल पण महाविकास आघाडीच्या मंत्र्याच्या घरी गांजा सापडतो. ड्रग्ज तस्कर सापडतात.

टिव्हीवर सतत महाविकास आघाडीचे मंत्री येऊन वाटेल ती टीका करतात. टिव्हीचा हा अत्याचार 15 दिवसांत थांबला नाही तर मी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून महाराष्ट्रातील किमान 10 लोकांना टिव्हीवर येण्यासाठी बंदी केली पाहिजे. या लोकांना पाहून घरात भांडणे होऊ लागली आहेत. घरातील कर्ते पुरुष टिव्ही पाहून संतापू लागले आहेत. घरात नवरा-बायकोतील भांडणे वाढली आहेत, असे ते म्हणाले.

Sujay Vikhe Patil
पवार-विखे वादाला तरूणाई मैत्रीत बदलू पाहतेय...

कपडे काढा पण मंत्रीपद काढू नका

महाविकास आघाडी सरकार तयार होताना शिवसेनेचे एक नेते होते. त्यांना पाहून लोक वैतागले, हैराण झाले. आता दुसरे नेते आले. यात काँग्रेसचे कोणी दिसत नाही. कारण, ते लकी ड्रॉमध्ये मंत्री झाले आहेत. त्यामुळे त्यांना काही बोलायचे नाही. काँग्रेसचे असे झाले आहे, की 40 आमदारांमध्ये 10 मंत्रीपद मिळाले आहे. त्यामुळे राहुल गांधींना शिव्या घातल्या तरी ते काही बोलत नाहीत. सोनिया गांधींवर टीका केली तरी ते काही बोलत नाहीत. त्यांचे म्हणणे एवढेच आहे की, आम्हाला लाथा मारा, चाबुक मारा, आमचे कपडे काढा पण आमचे मंत्रीपद काढू नका, अशा निर्लज्जपणे महाविकास आघाडी सरकारने जेव्हा काम करायला सुरवात केली आहे, अशी टीका खासदार डॉ. विखे पाटील यांनी नाव न घेता महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर केली.

Sujay Vikhe Patil
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, राज्यानेही इंधनावरील शुल्क कपात करावी...

शेतकरी अनुदानाचा बाँब केव्हा फोडणार

काल एक जण म्हणाला आम्ही फटाकडा फोडू. तो दुसऱ्या दिवशी येऊन म्हणतो त्यापेक्षा मोठा बाँब फोडू, तिसऱ्या दिवशी तो टिव्हीवर येतो आणि म्हणतो, हायड्रोजन बाँब फोडणार. आमचं म्हणणे आहे की, शेतकरी अनुदानाचा बाँब केव्हा फोडणार. हे तर सांगा. आम्हाला अणुबाँब नको, हायड्रोजन बाँब नको, शेतकऱ्यांसाठी अनुदानाचा बाँब कधी टाकणार हे महाविकास आघाडीने स्पष्ट करावे, असे खासदार डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.

टिव्हीवर जे रान उठविले जाते आहे ते दोन वर्षांतील महाविकास आघाडीचा नाकर्तेपणा झाकतायावा यासाठी. त्यासाठी असे मंत्री लोक पुढे केले जात आहेत. अल्पसंख्यांक विभागाचे मंत्र्यांनी त्यांच्या विभागाच्या माध्यमातून किती अल्पसंख्यांकांना रोजगार दिला? अल्पसंख्यांक बांधवांसाठी कोणती योजना राबविली. याच्यावर कोणी भाष्य करत नाही म्हणून मला फार वाईट वाटते. महाराष्ट्रातील राजकारणाची पातळी एवढी कधीही खालावली गेली नव्हती. टिव्हीवर मंत्री पाहून दुःख होते. सर्वसामान्य लोक, शेतकरी, महिलांच्या प्रश्नांवर कोणीही लोकप्रतिनिधी बोलताना तयार नाही, अशी खंतही खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली.

Sujay Vikhe Patil
भाजप आधी कोण सोडणार : सुजय विखे की कर्डिले...

आमचा माणूस तिकडं जाणार होता...

खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, की विधान परिषदेची निवडणूक आली म्हणून काही नगरसेवकांनी टीव्ही, गाड्या बुक केल्या, पण ते निराश झाले. मात्र, घाबरू नका. पुढच्या वेळेस मी दोन्ही बाजूंच्या उमेदवारांकडे तुमचे सेटिंग लावीन. या निवडणुकीत आमचाच माणूस तिकडे जाणार होता, असा टोला त्यांनी शिवाजी कर्डिले यांचा नामोल्लेख टाळून लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com