महाविकास आघाडी नेहमीच जनसेवेच्या मोडमध्ये

राज्याचे ऊर्जा राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे ( Prajakt Tanpure ) यांनी भाजपवर टीका केली.
महाविकास आघाडी नेहमीच जनसेवेच्या मोडमध्ये
Prajakt TanpureSarkarnama

अहमदनगर - सकाळच्या आयडल्स ऑफ महाराष्ट्र अंतर्गत काल शिर्डी येथे अहमदनगर जिल्ह्यातील नामांकीत डॉक्टर्स व महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमानंतर राज्याचे ऊर्जा राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे ( Prajakt Tanpure ) यांनी साम प्रतिनिधी गोविंद साळुंके यांच्याशी बोलताना भाजपवर टीका केली. ( Mahavikas Aghadi is always in public service mode )

भाजपने मुंबईत आगामी निवडणुकांच्या तयारी सुरू केली आहे. देवेंद्र फडणवीस यांची 15 मे रोजी मुंबईत सभा आहे. इलेक्शन मोडमधील भाजप बद्दल बोलताना मंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले, महाविकास आघाडीचा इलेक्शन व नॉन इलेक्शन मोड सारखाच असतो. आम्ही कायम लोकांच्या सेवेत रूजू असतो. मुंबई महापालिकेने कोविडसारखी परिस्थिती ज्या पद्धतीने हाताळली याचा डब्युएचओने गौरव केला आहे. त्यामुळे निवडणुका आल्या की मोडमध्ये येण्यासारखे महाविकास आघाडी सरकार नाही. महाविकास आघाडी नेहमीच जनसेवेच्या मोडमध्येच असतो. निवडणूक असो अथवा नसो, असे त्यांनी स्पष्ट केले.

Prajakt Tanpure
प्राजक्त तनपुरे म्हणाले, लवकरच भारनियमन कमी करणार

मनसेच्या भोंगे आंदोलनावर मंत्री तनपुरे पुढे म्हणाले की, धर्मावर वातावरण निर्मिती करण्याचा काळ वेगळा होता. आता जनता सुज्ञ आहे. सोशल मीडियातून जनतेचे मूलभूत प्रश्न काय आहेत. हे लोकांना कळते. त्यामुळे मूलभूत प्रश्नांकडून जनतेचे लक्ष हटवून दुसरीकडे नेत्याच्या प्रयत्नांना जनता फसणार नाही. जनता आता सोशल मीडियामुळे सुज्ञ झाली आहे, असा टोलाही मंत्री तनपुरे यांनी लगावला.

सकाळच्या आयडल्स ऑफ महाराष्ट्र कार्यक्रमाला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील, सकाळच्या पुणे आवृत्तीचे संपादक सम्राट फडणीस, सकाळचे सरव्यवस्थापक उमेश पिंगळे, अहमदनगर आवृत्ती प्रमुख प्रकाश पाटील, सहाय्यक वितरण व्यवस्थापक देवीदास आंधळे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.