Legislative Council election news : काँग्रेस नेत्यांने वाढवले ताबेंचे टेन्शन; 'पाटील यांच्या पाठिशी 'नगरची अज्ञात शक्ती'!

Legislative Council election news : शुभांगी पाटील या नगरमध्ये प्रचारासाठी आल्या होत्या.
Satyajit Tambe, Shubhangi Patil
Satyajit Tambe, Shubhangi PatilSarkarnama

Legislative Council election news : महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील यांना प्रचारासाठी नगरमध्ये दाखल झाल्या आहेत. नाशिक पदवीधरमध्ये आता अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे आणि शुभांगी पाटील यांच्या थेट लढत होणार आहे. त्यासाठी दोन्ही नेत्यांकडून जोरदार प्रचार सुरु आहे.

दरम्यान, शुभांगी पाटील यांना सध्या तांबेंच्या बालेकिल्ल्यात प्रचार करत आहेत. यांच्या प्रचार सभेमध्ये काँग्रेसच्या एका नेत्याने केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. काँग्रेसचे (Congress) सरचिटणीस विनायक देशमुख यांनी एक वक्तव्य केले आहे. त्यामुळे सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.

Satyajit Tambe, Shubhangi Patil
Uddhav Thackeray News : ठाकरेंनी डाव टाकला; कदम पिता पुत्रांची कोंडी; मोठा नेता करणार घरवापसी?

देशमुख म्हणाले ''शुभांगी पाटील यांच्या पाठीशी नगर जिल्यात अज्ञात शक्ती आहेत. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे. त्यामुळे आता ही अज्ञात शक्ती कोण? यावरून जिल्ह्यात एकच चर्चा रंगली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार पाटील शनिवारी अहमदनगर येथे प्रचारासाठी आल्या होत्या.

यावेळी बोलताना देशमुख म्हणाले, ''जिल्ह्यातील कार्यकर्ते व्यक्ती पूजेपेक्षा विचारधारेला व पक्षाच्या आदेशाला महत्त्व देतात. तसचे नगर जिल्ह्यातील प्रत्येक निवडणुकीत अज्ञात शक्ती कार्यरत असते. या शक्तीच निवडणूक निकालाला दिशा देत असतात. त्यामुळे नगर जिल्ह्यातून शुभांगी पाटील यांना निश्चितच आघाडी मिळेल, असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला आहे.

देशमुख यांच्या वक्तव्याचे वेगळे अर्थ काढले जात आहेत. जिल्ह्यात भाजपचे (BJP) नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची सर्वपक्षीय यंत्रणा नेहमीच चर्चेत असते. विखे पाटील कोणत्याही पक्षात असले तरी ही सर्वपक्षीय यंत्रणा त्यांना हवी असलेली कामगिरी करते, अशी चर्चा प्रत्येक निवडणुकीच्या वेळी जिल्ह्यात होत असते. सध्याच्या निवडणुकीतही काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या भूमिकेकडे जसे लक्ष आहे, तसेच ते विखे पाटील यांच्या भूमिकेकडेही आहे.

Satyajit Tambe, Shubhangi Patil
Congress News : काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर, थेट ३८ नेत्यांची हकालपट्टी!

सत्यजीत तांबे यांना पक्षाने पाठिंबा दिल्यास त्यांचे काम करुन असे, विखे पाटील म्हणाले होते. मात्र, अद्याप भाजपने तांबे यांना पाठिंबा दिलेला नाही. मात्र, देशमुख यांनी अज्ञात शक्ती असा उल्लेख केल्याने ही शक्ती नेमकी कोणती? असा सवाल उपस्थित झाला आहे. यावेळी महाविकास आघाडीत घटक पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in