महाराष्ट्राच्या परिवर्तन क्रांतीची होणार सुरुवात; संभाजीराजेंचं सूचक ट्विट

Sambhajiraje Chhatrapati| मे महिन्यात छत्रपती संभाजीराजे यांना तुळजाभवानी मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला होता.
Sambhajiraje Chhatrapati|
Sambhajiraje Chhatrapati|

कोल्हापूर : ''क्रांती दिनी होणार महाराष्ट्राच्या (Maharashtra) परिवर्तनाच्या क्रांतीची सुरूवात... भेटूया ९ ऑगस्ट रोजी तुळजापूरला..'' असे ट्विट करत राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी केले आहे. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राच्या परिवर्तनाच्या क्रांती उपक्रमाची घोषणा केली आहे. येत्या 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनाच्या (Kranti Din) निमित्ताने संभाजीराजे महाराष्ट्राच्या परिवर्तनाच्या क्रांतीची सुरुवात करणार आहेत.

दरम्यान मे महिन्यात छत्रपती संभाजीराजे यांना तुळजाभवानी मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला होता. यामुळे मोठा वादही निर्माण झाला होता. तुळजापूर शहरही बंद ठेवण्यात आले होते. या प्रकारामुळे जनभावना दुखावली गेल्याचे काहींचे म्हणणे होते. या घटनेनंतर संभाजीराजे पहिल्यांदाच तुळजापूरला जात आहेत. या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजेंनी क्रांती दिनी तुळजापूर येथून परिवर्तनाच्या क्रांतीची सुरुवात करणार असल्याचे ट्विट केले आहे. त्यांच्या या ट्विटनंतर राज्यातील सामाजिक व राजकीय वर्तुळाचे याकडे लक्ष लागले आहे. याशिवाय संभाजीराजे यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून तुळजापूर येथे नेमके काय केले जाणार आहे, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

Sambhajiraje Chhatrapati|
शिवसेना कार्यकर्ते भाजप विरोधात पेटून उठतील!

नक्की काय आहे प्रकरण?

मे महिन्यात उस्मानाबादचे जिल्हाधिकारी आणि मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी, मंदीरात ज्या पूजाऱ्याची पाळी आहे त्याने वगळता इतर कोणालाही मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्यास बंदी केली होती. या नियमाच्या आधारे संभाजी महाराजांना अडवण्यात आल्याचा खुलासाही त्यावेळी करण्यास आला.

मात्र तुळजाभवानी माता ही छत्रपती घराण्याची कुलस्वामिनी आहे. छत्रपती घराण्यातील कोणतीही व्यक्ती जेव्हा तुळजाभवानी मातेच्या दर्शनास जाते तेव्हा त्यांना थेट गाभाऱ्यात जाऊन विधिवत मातेचे दर्शन घेता येते, ही शेकडो वर्षांची परंपरा आहे. सोमवारी रात्री 9 वाजता युवराज संभाजीराजे छत्रपती दर्शनासाठी तूळजाभवानी मंदीरात गेले होते. मात्र यावेळी मातेच्या गाभाऱ्यात जाण्यापासून त्यांना रोखण्यात आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in