गणपतराव देशमुखांच्या कार्याची सरकारकडून दखल ; विधानसभेचे स्मृतिपत्र प्रदान

एकाच मतदारसंघांमध्ये सलग अकरा वेळा प्रतिनिधित्व करून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये दोन वेळा मंत्री म्हणून केलेल्या कार्याची दखल घेतली आहे.
गणपतराव देशमुखांच्या कार्याची सरकारकडून दखल ; विधानसभेचे स्मृतिपत्र प्रदान

सांगोला :स्वर्गीय माजी आमदार गणपतराव देशमुख (ganpatrao deshmukh) यांनी महाराष्ट्र विधानसभेमध्ये (maharashtra legislative assembly) केलेले कार्य चिरकाल राहावे, महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये कायम त्यांचे कार्य स्मरणात राहील, यासाठी त्यांच्या कुटुंबियांना विधानसभेचे स्मृतिपत्र प्रदान करण्यात आले आहे. (ganpatrao deshmukh news)

आमदार शहाजी पाटील यांच्या हस्ते शनिवार (ता. 16) रोजी गणपतराव देशमुख (आबा) यांच्या निवासस्थानी त्यांच्या पत्नी रतनबाई देशमुख, पुत्र चंद्रकांत देशमुख, नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्याकडे हे स्मृतीपत्र देण्यात आले. यावेळी सांगोल्याचे तहसीलदार अभिजीत पाटील, सांगोला नगरपरिषदेची माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ यांच्यासह देशमुख कुटुंबीय उपस्थित होते.

गणपतराव देशमुखांच्या कार्याची सरकारकडून दखल ; विधानसभेचे स्मृतिपत्र प्रदान
राष्ट्रपती, मुख्यमंत्रीही थेट जनतेतूनच निवडा ; अजितदादांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

यापूर्वी महाराष्ट्र विधानमंडळाकडून आबांना माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याहस्ते'जीवन गौरव' पुरस्काराने सन्मानित केले आहे.विविध संस्थाकडूनही त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना विविध पुरस्कार मिळाले आहेत. एकाच मतदारसंघांमध्ये सलग अकरा वेळा प्रतिनिधित्व करून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये दोन वेळा मंत्री म्हणून केलेल्या कार्याची दखल घेत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी त्यांचे कार्य महाराष्ट्रातल्या जनतेच्या कायम स्मरणात राहील यासाठी त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या कार्याचा उल्लेख करून स्मृतीपत्र दिले आहे.

गणपतराव देशमुख यांना मिळालेले पुरस्कार

  • नवी दिल्ली - बेस्ट सिटीजन ऑफ इंडिया

  • 2003 क्रांतीसिंह नाना पाटील पुरस्कार

  • 2004 सार्वजनिक वाचनालय नाशिकचा 'कार्यक्षम आमदार' पुरस्कार

  • 2007 गांधी फोरम संघटना दिल्लीचा 'आदर्श समाजसेवक' पुरस्कार

  • 2009 तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाचा 'जीवनगौरव पुरस्कार'

  • 2010 महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघ मर्यादित मुंबई यांच्या वतीने 'वस्त्रोद्योग महर्षी' पुरस्कार

  • 2014 'रयत माऊली सौ. लक्ष्मीबाई पाटील पुरस्कार'

  • 2017 भारती विद्यापीठ पुणे यांच्या वतीने 'जीवन साधना गौरव पुरस्कार'

  • 2018 अग्निपंख फाउंडेशन तर्फे 'डॉ. ए पी जे अब्दुल कलाम जीवनगौरव पुरस्कार'

  • 2020 किसनवीर सहकारी साखर कारखाना, सातारा यांच्या वतीने 'आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in