Mahadev Jankar fight Baramati Loksabha : महादेव जानकर पुन्हा उतरणार बारामतीच्या मैदानात; भाजपच्या अडचणी वाढल्या

Mahadev Jankar Birthday : "जनतेचाच पैसा अन् जनतेचाच पक्ष असण्यावर विश्वास"
Mahadev Jankar
Mahadev JankarSarkarnama

RSP News : राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने राज्यात सर्व जागांवर उमेदवार उभे करणार आहे. बारामतीतही आमच्या पक्षाचे तगडे आव्हान असणार आहे, असे म्हणत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार महादेव जानकर यांनी बारामती लोकसभा पुन्हा लढविण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, भाजपही बारामती लोकसभेला उमेदवार देण्याचा विचार करत आहे. आता जानकरांच्या भूमिकेमुळे भाजपच्या अडचणी वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

निमगाव केतकी (Indapur News) येथे गुरुवारी (ता. १३) महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी वनीकरणात चिंकारासह वन्य प्राण्यास टँकरद्वारे कृत्रीम पाणीवाट्यात पाणी सोडून आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी पक्ष जनतेच्या पैशांवर चालणाऱ्या पक्षावर विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले. जानकर म्हणाले, "जनतेचाच पैसा आणि जनतेचाच पक्ष असायला पाहिजे. भांडवलदाराचा पैसा घ्यायचा आणि कोणाच्यातरी ऑर्डरवर काम करायचे मला जमत नाही."

मला मोठे करण्यात इंदापूर (Indapur) तालुक्याचे योगदान आहे. तसेच वाढदिवसानिमित्त यावेळी पक्षाकडून ५५ लाख मिळणार असल्याचेही जानकरांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, "मी वयाच्या ५५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. मी १ एप्रिलपासून ३० मेपर्यंत वाढदिवस साजरा करतोय. संघटनात्मक ताकद वाढावी आणि त्यातून दोन पैसे मिळाल्यामुळे महाराष्ट्रातील २८८ तालुक्यातून मिळून मला ५५ लाख रुपये मिळतात. ही रक्कम मुंबई राष्ट्रीय समाज पक्षाच्या विभागाच्या माध्यमातून दि. १९ एप्रिल रोजी मिळते. मला मोठे करण्यात इंदापूर तालुक्याचे उपकार आहेत. आताही मला पाच लाख रुपये जनतेतून मिळालेले आहेत."

यावेळी त्यांनी दिल्लीत रासप (RSP)चे कार्यालय बांधणार असून त्याचा समाजाला फायदा होईल, असा विश्वासही व्यक्त केला. जानकरांनी सांगितले की, "दिल्लीत चार कोटीची जागा घेतली आहे. त्या ठिकाणी पक्षाचे अद्यावत कार्यालय निर्माण करणार आहे. त्याचा सर्व समाजाला फायदा कसा होईल यासाठी आपण प्रयत्नशील असणार आहे." यावेळी बारामती (Baramati) लोकसभा लढविणार का असे विचारण्यात आले. त्यावर जानकरांनी स्पष्टच सांगितले की, "राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने राज्यात सर्व जागांवर उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. बारामतीत देखील आमच्या पक्षाचे तगडे आव्हान असणार आहे."

दरम्यान, रासपचे अध्यक्ष माजी मंत्री जानकर यांनी २०१४ मध्ये बारामतीची लोकसभा निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना टक्कर देत चार लाख ५७ हजार ८४३ मते घेतली होती. त्यावेळी सुप्रिया सुळे या ६९ हजार ७१९ मतांनी विजयी झाल्या होत्या.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com