महादेव जानकर म्हणाले, भाजपने आमच्याशी गद्दारी केली...

रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर ( Mahadev Jankar ) यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
Mahadev Jankar
Mahadev JankarSarkarnama

अहमदनगर : राष्ट्रीय समाज पक्षाच्या जन संपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा व पदाधिकारी आढावा बैठक काल ( गुरुवारी ) अहमदनगर येथे झाली. जन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी महादेव जानकर यांनी भाजपवर जोरदार टीका केली. Mahadev Jankar said, BJP betrayed us...

जानकर म्हणाले, राष्ट्रीय समाज पक्ष हा स्वतंत्र पक्ष आहे. केंद्र व राज्याच्या निवडणुकीत, सत्तेत त्यांच्याबरोबर आहोत. मात्र, स्थानिक निवडणुका आम्ही स्वबळावर लढणार आहोत. ज्या वेळेला आम्ही महाराष्ट्रामध्ये भाजपबरोबर होतो, त्या वेळेलासुद्धा आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र लढलो आहोत. आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा आहे. त्यामुळे आम्ही स्वबळावरच निवडणूक लढणार आहे.

Mahadev Jankar
कुणाचाही आधार घेईन, पण एक दिवस पंतप्रधान होईलच : महादेव जानकर

जानकर पुढे म्हणाले, भाजप हे जिंतूर व दौंडची जागा राष्ट्रीय समाज पक्षाला देणार होते. मात्र, त्यांनी त्या जागा आम्हाला दिल्या नाहीत. याचा जाब आता भाजपच्या नेत्यांना विचारला पाहिजे. मित्रानेच आमच्याशी गद्दारी केली, आमची मान कापली. 'भाजप'ने आमचा विश्वासघातच केला आहे, यावर मी ठाम आहे, अशी टीका जानकरांनी केली.

देशामध्ये आज पाच राष्ट्रीय पक्ष आहेत. आम्हालासुद्धा राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळाली पाहिजे, या उद्देशाने आम्ही आता इतर राज्यांमध्ये निवडणूक लढवत आहोत. येणाऱ्या उत्तरप्रदेश निवडणुकीतही लढवणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Mahadev Jankar
मी सध्या भाजपसोबत; पण भविष्यात काही गोष्टी घडल्या तर पर्याय खुले : जानकर 

म्हणून मी पवारांना भेटायला गेलो होतो

महादेव जानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नुकतीच भेट घेतली होती. या बाबत विचारले आसता ते म्हणाले, माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्याचे साखर कारखान्याचे लायसन्स रद्द झाले व ते लायसन्स परत मिळावे, यासाठी मी उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. पवार यांनी तत्काळ हे काम मार्गी लावले. ही भेट राजकीय स्वरुपाची नव्हती, असे जानकरांनी स्पष्ट केले.

तर पंकजा मुंडेंना योग्यतो सल्ला देईल

जानकर म्हणाले, पंकजा मुंडे या भाजपमध्ये नाराज आहेत, असे मला वाटत नाही. जर बहिणीला सासुरवास होत असेल, तर ती निश्चितच माहेरी सांगत असते. त्या जेव्हा माझ्या कानात सांगतील, त्यावेळेला मी त्यांना योग्य तो सल्ला देईल असेही जानकर यांनी सांगितले.

ईडी व इतर संस्थांचा केंद्राकडून होत असलेल्या वापरा बाबत महादेव जानकर म्हणाले, ज्याला कर नाही, त्याला डर कशाला? पाहिजे. काँग्रेसनेही सत्तेचा वापर अशाच पद्धतीने केला होता, तसाच वापर आता भाजप करत आहे, असे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com