Shambhuraj Desai in Mahabaleshwar
Shambhuraj Desai in Mahabaleshwarsarkarnama

महाबळेश्वर सुशोभीकरण; व्यापाऱ्यांच्या प्रश्नांवर पालकमंत्री काढणार सुवर्णमध्य

पालकमंत्री श्री. देसाई Shambhuraj Desai म्हणाले, या आराखड्यानुसार साबने रस्त्याचे सुशोभिकरण Beautification of Sabane road करण्यात येत आहे. त्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा चार फूट जागा घेण्याचे प्रस्तावित होते. त्यास व्यापाऱ्यांचा विरोध Merchants' opposition आहे.

सातारा : महाबळेश्वर पर्यटन विकास आराखड्यातील साबने रस्त्याच्या सुशोभीकरणात व्यापाऱ्यांचे नुकसान होणार नाही, असा सुवर्णमध्य लवकरच काढला जाईल. त्यासाठी व्यापाऱ्यांशी सकारात्मक चर्चा झाली आहे, अशी माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

महाबळेश्वर पर्यटन आराखड्याबाबत आज तेथील हिरडा विश्रामगृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, महाबळेश्वर तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील, मुख्याधिकारी पल्लवी पाटील, सवानी या विकासक कंपनीचे राम सवानी, महाबळेश्वरचे पोलिस निरीक्षक संदीप भागवत आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार महाबळेश्वर पर्यटन विकास आराखडा तयार करण्यात येत असल्याचे सांगून पालकमंत्री श्री देसाई म्हणाले, या आराखड्यानुसार साबने रस्त्याचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा चार फूट जागा घेण्याचे प्रस्तावित होते. त्यास व्यापाऱ्यांचा विरोध आहे.

Shambhuraj Desai in Mahabaleshwar
म्हणून... एकनाथ शिंदे समर्थक आमदारांना घेऊन गुवाहाटीच्या दौऱ्यावर जाणार

या प्रश्नावर मध्यम मार्ग काढण्यात यावा. व्यापाऱ्यांचे नुकसान होणार नाही असे पहावे. ज्या ठिकाणी कोणतीही अडचण नाही तेथे कामे सुरू करावीत अशा सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी व्यापाऱ्यांशी चर्चा करून व्यापाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. व्यापाऱ्यांचे नुकसान होणार नाही असा मध्यम मार्ग काढू असेही त्यांनी यावेळी सांगितले .

Shambhuraj Desai in Mahabaleshwar
Patan : निवडणुकांपुरते मतदारसंघात फिरणाऱ्यांपासून सावध राहा : शंभूराज देसाई

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in