राऊतांच्या अंगात आलं ते बरं झालं, मी मंत्री झालो ; कदमांनी उलगडलं ठाकरे सरकारचं गुपीत !

निवडून आलो तरी विरोधी बाकावर बसावं लागणार होतं...
राऊतांच्या अंगात आलं ते बरं झालं, मी मंत्री झालो ; कदमांनी उलगडलं ठाकरे सरकारचं गुपीत !
Vishwajeet Kadam latest Marathi newsSarkarnama

सांगली : राज्यात महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) कशी सत्तेवर आली, याचं गुपीत काँग्रेसचे नेते, राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी उलगडलं. कदम हे एका कार्यक्रमात बोलत होते. (Vishwajeet Kadam latest Marathi news)

कदमांनी मिस्किलपणे महाविकास आघाडी सत्तेवर कशी आली, हे सांगितले. यामुळे आमणापूर ग्रामस्थांना पुन्हा दिवंगत डॉ. पतंगराव कदम यांची आठवण आली.

"निवडून आलो तरी विरोधी बाकावर बसावं लागणार होतं, पण शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांच्या अंगात आलं आणि तीन पक्षाची महाविकास आघाडी स्थापन झाली," असे विश्वजीत कदम यांनी सांगितले. यामुळे उपस्थितांमध्ये हास्यांचे फवारे उडाले.

Vishwajeet Kadam latest Marathi news
एकनाथ खडसेंना 'त्या' तीन मतांपैकी एक मत नक्की मिळणार ; परतफेड शक्य

आमणापूर ग्रामस्थांशी संवाद साधताना करताना राज्यमंत्री कदम चांगलेच मुडमध्ये होते. कदमांची यावेळी भाषणात जोरदार बँटींग केली. त्यामुळे उपस्थितांना पुन्हा एकदा दिवंगत डॉ. पतंगराव कदम यांच्या भाषणाची आठवण आली.

पलूस तालुक्यातील आमणापूर येथील विविध विकासकामांचे उद्घाटन कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या हस्ते झाले. या निमित्ताने आयोजित समारंभात बोलताना, महाविकास आघाडी कशी सत्तेवर आली यावर भाष्य केले.

Vishwajeet Kadam latest Marathi news
Presidential Election: शरद पवारांना राजनाथ सिंह यांचा फोन; उमेदवारीबाबत चाचपणी

कदम म्हणाले,"विधानसभा निवडणुकावेळी प्रचारासाठी फिरत होतो, त्यावेळी आपण लोकांना कानात सांगत होतो, मला निवडून दिले की, कदाचित मला विरोधी पक्षाच्या बाकावर बसावे लागेल,सत्ता काय आमची येत नाही. पण निवडणूक झाली.आणि शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या अंगात आले ते बरं झालं. त्यामुळे राज्यात तीन पक्षाचे महाविकास आघाडी सरकार आलं,"

"इतिहासात एक अजब अशी गोष्ट घडली आणि तुमच्या आशीर्वादाने, या मातीच्या पुण्याईने राज्याचा एक तरुण मंत्री म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली," असे कदम म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in