मनसेची अक्षय तृतीयेला साताऱ्यात महाआरती

सरकारने Government अवैध भोंगे Illegal Speakers काढून न्यायालयाने Court दिलेल्या आदेशांचे पालन करावे. परवानगी घेतल्याशिवाय कोणीही स्पीकर लावू शकत नाही, तसेच रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत स्पीकर लावता येत नाही.
मनसेची अक्षय तृतीयेला साताऱ्यात महाआरती
Yuvraj Pawar, Raj Thackeray, Rahul Pawarsarkarnama

सातारा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येत्या तीन मेपर्यंत मशिदीवरील भोंगे काढण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे साताऱ्यातील सर्व मशिदींवरील अवैध भोंगे शासनाने काढावेत व न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे. येत्या अक्षय तृतीयेला साताऱ्यातील राजवाडा येथील हनुमान मंदिरासमोर मनसेच्या वतीने महाआरती केली जाणार आहे. या महाआरतीला हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मनसेचे जिल्हाध्यक्ष युवराज पवार व सातारा शहराध्यक्ष राहुल पवार यांनी पत्रकार परिषदेत केले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीन तारखेपर्यंत सर्व मशिदीवरील भोंगे काढण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर सातारा मनसेच्या वतीने आज भूमिका जाहीर करण्यात आली. यासंदर्भात युवराज पवार म्हणाले, ‘‘तीन मे रोजी अक्षय तृतीयेला सातारा, जावळी, वाई, खंडाळा, महाबळेश्वर आणि कोरेगाव येथील मनसे सैनिकांच्या वतीने साताऱ्यातील ऐतिहासिक राजवाडा येथील मारुती मंदिरासमोर महाआरतीचे आयोजन केले आहे. हिंदू बांधवांनी या महाआरतीत प्रचंड संख्येने सहभागी व्हावे.’’

Yuvraj Pawar, Raj Thackeray, Rahul Pawar
Video: राज ठाकरे यांच्या सभेसाठी बाळा नांदगावकर यांनी केली मैदानाची पाहणी

राहुल पवार म्हणाले, ‘‘या महाआरतीला स्पीकर परवाना दिला नाही, तर आम्ही तोंडी महाआरती करू. आरती घेण्यास कोणाचीही हरकत नसेल, तसेच कोणत्या धर्माचे असू देत त्यांनी भोंगे व स्पीकर लावताना परवानगी घ्यावी. सरकारने अवैध भोंगे काढून न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे पालन करावे. परवानगी घेतल्याशिवाय कोणीही स्पीकर लावू शकत नाही, तसेच रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत स्पीकर लावता येत नाही.’’

Yuvraj Pawar, Raj Thackeray, Rahul Pawar
पाडव्याच्या सभेनंतर राज्याचं राजकारण बदललयं; मनसे नेत्याचं सूचक वक्तव्य

या वेळी जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्रकुमार फाळके, महिला जिल्हाध्यक्षा सोनाली शिंदे, राहुल शेडगे, अमोल गरड, अविनाश दुर्गावळे, वैशालीताई क्षीरसागर, भरत रावल, राजेंद्र बावळेकर, सागर बर्गे, अश्विन गोळे, राजेंद्र शिंदे, नीलेश आवारे, महेंद्र साठे, प्रेमला कोलते पाटील, श्री. हिरवे, राजेश माने, गुलाबराव मर्ढेकर आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.