Udayanraje Bhosale : शिवजयंती दिनी साताऱ्यात उदयनराजेंच्या हस्ते महाआरती

Satara : सातारा ही मराठा साम्राज्याची राजधानी असून तिला तब्बल 300 वर्षाचा दैदीप्यमान इतिहास आहे.
MP Udayanraje Bhosale
MP Udayanraje Bhosalesarkarnama

Satara News : शिवजयंती दिनी रविवारी (19 फेब्रुवारी) खासदार उदयनराजे भोसले मित्र समूहाच्या वतीने पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज Chhatrapati Shivaji Maharaj यांच्या पुतळा परिसरात शिवरायांचे थेट तेरावे वंशज खासदार उदयनराजे भोसले MP Udayanraje Bhosale यांच्या हस्ते महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे.

सातारा ही मराठा साम्राज्याची राजधानी असून तिला तब्बल 300 वर्षाचा दैदीप्यमान इतिहास आहे. पोवई नाक्यावरील शहराच्या मध्यभागी असणारा छत्रपती शिवरायांचा पुतळा हा समस्त साताऱ्याचाच नव्हे तर महाराष्ट्राच्या अभिमानाचा केंद्रबिंदू आहे. यंदाची शिवजयंती विशेष बनवण्याचा निर्धार खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केला आहे. रविवारी (ता. 19) उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवरायांच्या पुतळा परिसरात ही महाआरती होणार आहे.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे धाकटे बंधू डॉ. नारायणराव सावरकर यांची नात शाहिर विनता जोशी यांना या महाआरती कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रित करण्यात आले आहे. सावरकरांच्या अनेक आठवणी आणि त्यांच्या जीवनातील समर्ग प्रसंग आपल्या खास शाहिरी अंदाजाने प्रसिद्ध करण्यासाठी विनता जोशी यांचे नाव आदराने घेतले जाते.

MP Udayanraje Bhosale
Udayanraje News; राजकारणात निवृत्तीचे वय ठरलं पाहिजे!

छत्रपतींचे तेरावे वंशज उदयनराजे भोसले व निमंत्रित मान्यवर यांच्या खास उपस्थितीत हा महाआरती कार्यक्रम सोहळा होणार आहे. यंदा या उपक्रमाचे दुसरे वर्ष आहे. ही आरती सायंकाळी सात वाजता पोवई नाका येथील शिवतीर्थावर घेतली जाणार आहे. सर्व शिवभक्तांनी या महाआरतीस उपस्थित राहावे, असे आवाहन उदयनराजे भोसले मित्र समूहाच्या वतीने करण्यात आले आहे.

MP Udayanraje Bhosale
Satara : ज्यांने त्याने उठायचे अन्‌ क्रेडीट घ्यायचे : शिवेंद्रराजेंनी घेतली उदयनराजेंची फिरकी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com