मधुकरराव पिचड म्हणाले, ‘अगस्ती’ वाचवायचा, की टोळीकडे द्यायचा?

माजी मंत्री मधुकरराव पिचड ( Madhukarrao Pichad ) यांनी विरोधकांवर टीका केली.
Madhukarrao Pichad News, Ahmednagar News in Marathi
Madhukarrao Pichad News, Ahmednagar News in MarathiSarkarnama

अकोले ( जि. अहमदनगर ) - अकोले तालुक्यातील अगस्ती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे राजूर येथे आदिवासी भागातील कार्यकर्ते व ऊस उत्पादक, अनुत्पादक शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री मधुकरराव पिचड ( Madhukarrao Pichad ) यांनी विरोधकांवर टीका केली. Agasti Sakhar karkhana Election News Update

या बैठकीला माजी आमदार वैभव पिचड, सी. बी. भांगरे, उपसभापती दत्ता देशमुख, गणपत भांगरे, विजय भांगरे, पांडुरंग भांगरे, जयराम इदे, पांडुरंग खाडे, सुरेश भांगरे, श्रावण भांगरे, रामनाथ भांगरे, तुकाराम खाडे, गणपत देशमुख, संपत झडे, दगडू पांढरे, बुधा पांढरे, पांडुरंग पाटील उपस्थित होते.

Madhukarrao Pichad News, Ahmednagar News in Marathi
मधुकरराव पिचड यांच्या मानसकन्येला अकोल्याचे नगराध्यक्षपद : बाळासाहेब वडजे उपाध्यक्ष

मधुकरराव पिचड म्हणाले, अकोले तालुक्याची भाग्यलक्ष्मी म्हणून ‘अगस्ती’ची निर्मिती केली. तुम्ही म्हणत असाल तर मी नेतृत्व करण्यास तयार आहे. अगस्ती वाचवायचा, की टोळीच्या ताब्यात द्यायचा? मी अर्ज भरला आहे तो ठेवायचा का नाही, हे तुम्हीच सांगा. आदिवासींना साखर दिली नाही म्हणणारे ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात, त्यांना का विचारत नाही, असा प्रश्‍न भांगरे यांचे नाव न घेता मधुकरराव पिचड यांनी उपस्थित केला.(Ahmednagar News in Marathi)

ते पुढे म्हणाले, की गेली चाळीस वर्षे काय केले? असे विचारले जाते. अगस्ती कारखान्याची निर्मिती करून यशस्वीरीत्या चालविला. आज जे विरोधक आहेत, त्यांना पदे देऊन मोठे केले. मुलाला बाजूला सारत त्यांना सन्मान दिला. मात्र, आज चाळीस वर्षांत काय केले म्हणतात. कृषी उत्पन्न, खरेदी-विक्री संघ, अमृतसागर दूध संस्था उभारून सहकारी संस्थांना बळकटी दिली. या निवडणुकीत तालुक्याची व ऊसउत्पादक, अनुउत्पादक शेतकरी यांची परीक्षा आहे. कारखाना अडचणीत असून, केंद्र सरकारच्या मदतीने निश्चितच अगस्ती ऊर्जितावस्थेत आणू, असे आश्वासनही त्यांनी या प्रसंगी दिले.

Madhukarrao Pichad News, Ahmednagar News in Marathi
मला या वयात रस्त्यावर उतरायला भाग पाडू नका - मधुकरराव पिचड

वैभव पिचड म्हणाले, की तालुक्यात जलसिंचन प्रकल्प हाती घेऊन त्याद्वारे शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी देऊन ऊसउत्पादक शेतकरी बनविले. केवळ वैयक्तिक लाभासाठी डाव्या-उजव्या बाजूला बसणारे पुढारी पळाले. आज तेच लोक साहेबांना आव्हान देत आहेत, असे त्यांनी सांगितले.

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा देशाच्या राष्ट्रपदीपदी आदिवासी महिला बसणार आहे. तालुक्याच्या आमदाराला विचारा, की पक्षाला महत्त्व देणार की आदिवासी समाजाच्या महिलेस मतदान करणार, असेही ते म्हणाले. गणपत भांगरे यांनी प्रास्तविक केले. विजय भांगरे यांनी आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com