मधुकर नवले म्हणाले, आम्हीही भिकेसाठी तुमच्यापुढे झोळी ठेवलेली नाही...

राष्ट्रवादी काँग्रेस ( NCP ) व शिवसेना ( Shivsena ) एकत्र तर काँग्रेस ( Congress ) स्वतंत्रपणे लढत आहेत.
Madhukar Nawale, Akole

Madhukar Nawale, Akole

Sarkarnama

अकोले ( अहमदनगर ) : अकोले नगर पंचायतची निवडणूक सध्या सुरू आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस ( NCP ) व शिवसेना ( Shivsena ) एकत्र तर काँग्रेस ( Congress ) स्वतंत्रपणे लढत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण झाल्याचे चित्र आहे. अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर नवले यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यावर जोरदार टीका केली. Madhukar Navale said, we also did not put a bag in front of you for begging ...

मधुकर नवले म्हणाले की, आमदार साहेब काँग्रेस पक्षाला दोन-चार जागा देता म्हणजे आम्हाला तुम्ही भीक घालत नाही. आम्हीही भिकेसाठी तुमच्यापुढे झोळी ठेवलेली नाही. काँग्रेस पक्षाचा जेव्हा अवमान, अवहेलना झाली. तेंव्हा स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेऊन आत्मविश्वासाने, हिमतीने निवडणूक लढवली. विजयासाठी काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरण समोर ठेवून प्रयत्न केले. यापुढेही निवडणूक लढवून काँग्रेस पक्षाचा झेंडा नगरपंचायत वर लावू असा टोला नवले यांनी लगावला.

Madhukar Nawale, Akole

मधुकर नवले म्हणाले, अकोलेचे बिहार झाले आहे...

मधुकर नवले पुढे म्हणाले, आघाडीचा धर्म पाळताना समन्वय ठेवताना राष्ट्रवादी पक्ष मोठा आहे. केवळ मान डोलवत होय म्हणायचे मात्र तुम्ही सांगितले पाहिजे काँग्रेसने इतक्या जागा घ्याव्यात. आम्ही इतक्या घेऊ, सेनेला इतक्या मात्र तुम्ही जसे खिशातून धन देता तसे दानशूर कर्ण सारखे तुमची भूमिका आम्हाला सांगत होता. तुमची कोणतीही भूमिका आम्ही मान्य केली नाही.

Madhukar Nawale, Akole

डॉ. किरण लहामटे म्हणाले, सत्ता द्या विकास पहा...

तुम्ही आम्हाला भीक घालत नाही. भिकेसाठी तुमच्या पुढे झोळी ठेवली नाही. जेव्हा काँग्रेस पक्षाचा अवमान अवहेलना झाली, त्या त्यावेळी पक्षाने स्वतंत्रपणे लढण्याची भूमिका घेऊन उमेदवार रिंगणात उतरवले. त्यांना निवडून आणण्यासाठी सनदशीर मार्गाने काम केले. मागील 13 जागेसाठी निवडणूक झाली व आज चार जागेची छाननी झाली त्यात सर्व समाजाला योग्य पद्धतीने जागा दिल्या पैकी मुस्लिम बांधवाना एक जागा देण्यात आली होती. तो उमेदवार आमचा दुसरीकडे गेला मात्र चार जागेत एक मुस्लिम उमेदवार देऊन काँग्रेस पक्ष सर्व जाती धर्म अठरापगड जातींना सोबत घेऊन निवडणूक लढवत आहे.

Madhukar Nawale, Akole

दशरथ सावंत म्हणाले, साखर सम्राटांचे पुतळे उभे करून शेतकरी, कामगारांना दर्शन घेण्यास भाग पाडले जाते...

विजयासाठी आमचे सर्व नेते कार्यकर्ते झटत असून येत्या 19 जानेवारीला निश्चित आम्ही यशस्वी होऊ. ज्या हिमतीने व आत्मविश्वासाने निवडणूक लढविल्या यापुढेही स्वाभिमानाने तसेच मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून काम करू, असेही मधुकर नवले यांनी सांगितले.

यावेळी सोन्याबापू वाकचौरे, दादा पाटील वाकचौरे व काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com