उंटावरून विजयी मिरवणूक काढणाऱ्या सांगोल्याचा खासदार नाईक निंबाळकरांना विसर

सांगोला तालुक्यातून २००९ मध्ये राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांना तब्बल ५२ हजारांहून अधिक मताधिक्य मिळाले होते. तुलनेने नवखा उमेदवार असूनही देशात मोदी लाट असल्याने निंबाळकर यांना २०१९ मध्ये सांगोला तालुक्यात अपेक्षेपेक्षा जास्त मते मिळाली होती.
MP Ranjitsinh Naik Nimbalkar
MP Ranjitsinh Naik NimbalkarSarkarnama

सांगोला (जि. सोलापूर) : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिनिधित्व केलेल्या माढा लोकसभा मतदारसंघाचे सध्याचे भाजप (BJP) खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर (MP Ranjitsingh Nimbalkar) यांना सांगोला (Sangola) तालुक्याचा विसरच पडला आहे. गेल्या वर्षभरापासून ते सांगोला तालुक्याकडे फिरकलेच नाहीत, त्यामुळे ‘खासदार गेले कुणीकडे’ असे म्हणण्याची वेळ मतदारांवर आली आहे. देशात अत्यंत लक्षवेधी ठरलेल्या माढा लोकसभा मतदारसंघातून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विजय मिळविल्यानंतर त्यांची सांगोला शहरातून उंटावरून मिरवणूक काढण्यात आली होती. ती जिल्ह्यात चांगलीच गाजली होती. (Madha MP Ranjitsinh Naik Nimbalkar forgot about Sangola)

लोकसभेच्या २०१९ रोजी झालेल्या निवडणुकीत नवखे उमेदवार असलेले रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या विरोधात सांगोला तालुक्यातील शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन प्रमुख पक्ष आणि या पक्षातील नेतेमंडळी उभी होती. (स्व.) माजी आमदार गणपतराव देशमुख आणि माजी आमदार दीपक साळुंखे हे दोन नेते विरोधात असतानाही सांगोला तालुक्यातील तरुणांनी भाजपचे खासदारकीचे उमेदवार असलेल्या निंबाळकर यांना तब्बल ७० हजार मते दिली होती. राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांच्यापेक्षा निंबाळकर फक्त ५ हजार मतांनी पिछाडीवर राहिले होते. याच सांगोला तालुक्यातून २००९ मध्ये राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांना तब्बल ५२ हजारांहून अधिक मताधिक्य मिळाले होते. तुलनेने नवखा उमेदवार असूनही देशात मोदी लाट असल्याने निंबाळकर यांना २०१९ मध्ये सांगोला तालुक्यात अपेक्षेपेक्षा जास्त मते मिळाली होती.

MP Ranjitsinh Naik Nimbalkar
शिंदे गटात शह-कटशह : कोकाटे, ठोंगे, साठेंच्या निवडीनंतर सावंत गटाची मुख्यमंत्र्यांकडे धाव

ज्या सांगोला तालुक्याने जिल्ह्यातील उमेदवार असून आणि तत्कालीन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांच्या विरोधात निंबाळकर यांना प्रचंड मते दिली होती. त्याच उमेदवाराने खासदार झाले की सांगोला तालुक्याकडे कमालीचे दुर्लक्ष केले आहे. गेली तीन वर्षांत काही अपवाद सोडल्यास खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे सांगोला तालुक्याकडे फिरकलेच नाहीत. त्यामुळे तालुक्यातील मतदारांचा चांगलाच अपेक्षाभंग झाला आहे.

MP Ranjitsinh Naik Nimbalkar
अशोक चव्हाणांची नाराजी दूर होणार; काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद देणार?

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला भेदून खासदार झालेल्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे सुरुवातीला राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर चांगलेच कौतुक झाले. राज्यात देवेंद्र फडणवीस आणि देशात नरेंद्र मोदी यांच्याकडे त्यांचे चांगलेच वजन असल्याने माढा लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी पर्यायाने मतदार संघातील सांगोला तालुक्यातील विकास कामांना चांगलीच गती मिळेल, अशी येथील मतदारांची धारणा होती. खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांच्यामुळे सांगोला तालुक्यातील मतदारांचा मात्र चांगलाच भ्रमनिरास झाला आहे.

MP Ranjitsinh Naik Nimbalkar
काही काळजी करू नका; सगळं काही ओक्के होईल : राष्ट्रवादीच्या नेत्याचे सूचक राजकीय भाष्य

देशात अत्यंत लक्षवेधी ठरलेल्या माढा लोकसभा मतदारसंघातून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विजय मिळवल्यानंतर त्यांची सांगोला शहरात उंटावरून काढलेली मिरवणूक चांगलीच गाजली होती. मात्र, उंटावरून मिरवणूक कढल्यापासून माढा लोकसभा मतदारसंघातील सांगोला तालुक्याच्या विकास कामाबाबत उदासीनता दाखवत त्यांनी आपले दर्शन केवळ दिल्ली आणि मुंबईतून दूरचित्रवाणीवरूनच देत आहेत, त्यामुळे सध्या ते मतदार संघाचा कारभार उंटावरून शेळ्या हाकल्याप्रमाणे करत असल्याची चर्चा सध्या सांगोला तालुक्यात दबक्या आवाजात सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com