प्रतिज्ञापत्रातून व्यक्त करावी लागत आहे शिवसैनिकांना निष्ठा

शिवसेना व शिंदे गट यांच्याकडून शिवसैनिकांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेण्याची जणू चढाओढ सुरू झाली आहे.
Uddhav Thackeray News, Eknath Shinde News, Vidarbha Shivsena News, Nagpur News
Uddhav Thackeray News, Eknath Shinde News, Vidarbha Shivsena News, Nagpur NewsSarkarnama

पुणे - राज्यात शिवसेनेचे दोन गट निर्माण झाले आहेत. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या गटात जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच शिवसेना व शिंदे गट यांच्याकडून शिवसैनिकांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेण्याची जणू चढाओढ सुरू झाली आहे. राज्यात अशा प्रतिज्ञापत्रांचे पेव फुटले आहे. Shivsena News Update

नेते, कार्यकर्ते व पदाधिकारी आपल्याच बरोबर रहावेत यासाठी दोन्ही गट प्रयत्न करताना दिसत आहेत. यातच आता शिवसेना कार्यकर्त्यांकडून 100 रुपयांच्या बॉण्डवर प्रतिज्ञापत्रच लिहून घेतले जात आहे. यवतमाळमध्ये शिवसेना बंडखोर आमदार संजय राठोड यांच्या कार्यालयात असे प्रतिक्षापत्रे लिहून घेतली जात आहेत.

Uddhav Thackeray News, Eknath Shinde News, Vidarbha Shivsena News, Nagpur News
उद्धव ठाकरे -एकनाथ शिंदे भेटणार ; भाजपला धन्यवाद, शिवसेना नेत्याच्या टि्वटमुळे खळबळ

जळगावमध्ये शिवसैनिकांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जात आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यानुसार हे प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जात असल्याचे सांगितले जात आहे.

Uddhav Thackeray News, Eknath Shinde News, Vidarbha Shivsena News, Nagpur News
ठाणे शहरासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय

त्यामुळे एककाळ निष्ठावान कार्यकर्त्याचा पक्ष म्हणून मानला जात असलेल्या शिवसेनेतच निष्ठा प्रतिज्ञापत्रावर व्यक्त करावी लागत असल्याची खंत सर्वसामान्य शिवसैनिक व्यक्त करत आहेत. शिवसेनेची राज्यात झालेली ही फुट राजकीय चर्चेचा विषय ठरत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in