कंगनाचे पाहून गोखलेंनाही 'पद्मश्री' व्हायचं दिसतंय..

आज स्वातंत्र्यावर बोलले. उद्या राज्यघटना (Constitution) बोगस आहे असे म्हणतील.
balasaheb thorat
balasaheb thoratsarkarnama

पुणे : देशाच्या स्वातंत्र्याबद्दल आणि महात्मा गांधींजीवर (Mahatma Gandhi) टीका केल्यावर 'पद्मश्री' व संरक्षण मिळते. कंगना रणावतला (Kangana Ranaut) ते मिळाले. तिचे संरक्षण आणि 'पद्मश्री' पुरस्कार बघून मराठी अभिनेते विक्रम गोखलेंनाही (Vikram Gokhle) पद्मश्री व्हायचं दिसतंय, असा टोला काँग्रेस नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी लगावला आहे. ते नगर येथील एका कार्यक्रमात बोलत होते.

balasaheb thorat
जानकरांनी भाजप नेत्यांना उघडे पाडले; आमच्या काळात कुठे झाले विलीनीकरण

थोरात म्हणाले, "कंगना म्हणते स्वातंत्र्य ही भीक आहे. 2014 साली खरे स्वातंत्र्य मिळाले. कसले स्वातंत्र्य मिळालं? हे बोलणं वेडेपणाचे आहे. त्यावर बोलण्यात अर्थ नाही. कुणी तरी बोलायचं मग लगेच त्यांना संरक्षण मिळतं. 40 बॉडिगार्ड उभे राहतात. जो वादग्रस्त बोलला त्याला त्रास होऊ नये म्हणून संरक्षण दिलं जाते. पुढे लगेच पद्मश्री मिळते. असे पाहिल्यानंतर विक्रम गोखले नावाचे गृहस्थ बोलायला लागले. त्यांनाही पद्मश्री व्हायचं दिसतंय. याचा अर्थ कसं बोला कसं वागा ते चालतं," अशी जोरदार टीका थोरातांनी केली आहे.

balasaheb thorat
राणे म्हणतात, ''अजितदादांकडे मुख्यमंत्रीपदाचा चार्ज द्या''

आजही जगात जिथे-जिथे चळवळ चालते तिथे महात्मा गांधींचेच नाव घेऊन चळवळ चालते. स्वातंत्र्यासाठी अनेकांनी त्याग केला. अनेकांनी अंगावर गोळ्या झेलल्या. घरावर नांगर फिरला आहे. स्वातंत्र्य हे सहज मिळाले नाही. महात्मा गांधींजींच्या सत्याग्रहाच्या विचारामुळेच स्वातंत्र्य मिळाले आहे. यासाठी प्रेरणा ही गांधीजींच्या विचारातून मिळाली होती. ते राष्ट्रपिताच आहेत. त्यांना विचाराने कोणी संपू शकत नाही, म्हणून त्यांच्यावर टीका केली जात असल्याचे थोरात यांनी सांगितले.

थोरात म्हणाले, हे लोक आज स्वातंत्र्यावर बोलले. उद्या हे राज्यघटनेवरही बोलतील. राज्यघटना बोगस आहे असे म्हणतील. याबरोबरच गरीबांना कशाला हवाय मतांचा अधिकार? असेही ते म्हणतील. त्यांच्या विचाराची दिशा पाहा, सर्व तुमच्या लक्षात येईल. हे बोलणे सहज नाही. कोणाचा तरी मेंदू यामागे काम करत असतो. काही दिवसांनी ते आपल्या राज्यघटनेवर येऊन पोहोचले तर, आश्चर्याचे कारण नाही. त्यांना माहित आहे. धर्माचे नाव घेतल्यावर लोक मतदान करतात. हे त्यांच्या पक्के लक्षात आहे. मते घ्यायचे आणि वाटेल तसे वागायचे हे चालू आहे. असा घणाघात थोरातांनी भाजपवर केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com