विधान परिषदेची उमेदवारी न मिळालेल्या राहुल आवाडेंना आता लोकसभेची ऑफर!

हातकणंगले (Hatkanangale Lok sabha Constituency मतदारसंघात निवडणुकीआधीच राजकीय हालचाली..
विधान परिषदेची उमेदवारी न मिळालेल्या राहुल आवाडेंना आता लोकसभेची ऑफर!
Rahul AwadeSarkarnama

इचलकरंजी : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून (Hatkanangale Lok sabha Constituency) जिल्हा परिषद सदस्य असलेले (ZP Member Rahul Awade) राहुल आवाडे आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवार असतील, अशी घोषणा आमदार प्रकाश आवाडे (Prakash Awade) यांनी भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या उपस्थितीत ताराराणी आघाडीच्या कार्यालयात काल (ता.19 नोव्हेंबर) केली. त्यामुळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून भाजपचे संभाव्य उमदेवार म्हणून राहुल आवाडे यांच्या नावाची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे.

Rahul Awade
माणसे गेल्याच्या आणि देशद्रोही ठरविल्याच्या जखमा अन्नदाता विसरणार नाही

विधान परिषद निवडणुकीच्या (Legislative Council Elections) निमित्ताने उमेदवार भेटीगाठी घेत आहेत. भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारासाठी पाटील यांनी आवाडे यांच्यासह त्यांच्या समर्थक नगरसेवकांची भेट घेतली. भेटीत आवाडे यांनी विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने आपली भूमिका मांडली. उमेदवारीच्या शर्यतीत राहुल यांचे नावदेखील होते. मात्र, सर्वानुमते अमल महाडिक यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. आगामी लोकसभा निवडणुकीत राहुल उमेदवार असतील, असे आमदार आवाडे यांनी सांगितले. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी टाळ्यांचा कडकडाट करीत घोषणाबाजी केली. यावेळी पाटील यांनीही त्याला स्मितहास्य करीत दाद दिली. या अनपेक्षित घडामोडीने लोकसभा निवडणुकीचे पडघम आतापासूनच वाजू लागल्याचे चित्र यावेळी बघायला मिळाले.

Rahul Awade
सव्वा लाखाची शाल पांघरणाऱ्या नरेंद्र मोदींचे हे फोटोपण पाहा

या घोषणेनंतर आवाडे समर्थकांनी राहुल हे लोकसभेची निवडणूक लढविणार असल्याची पोष्ट सोशल मीडियावर व्हायरल केली. यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघातून राहुल भाजपचे संभाव्य उमदेवार म्हणून आतापासूनच चर्चा सुरू झाली आहे. मुळात आवाडे-माने हा मोठा राजकीय संघर्ष झाला आहे. या घडामोडीमुळे पुन्हा एकदा नव्याने या संघर्षाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. एकूणच विधान परिषदेचा प्रचार सुरू असताना लोकसभा निवडणुकीचे पडघम आतापासूनच सुरू झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in