सत्तांतरानंतर पवार, मुंडे, क्षीरसागर, भरणेंची प्रतिष्ठा पणाला; दीड महिन्यातच ताकद कळेल!

राज्यातील 92 नगरपालिकांच्या निवडणुका 18 ऑगस्ट रोजी होणार आहेत.
Local Body Election News, MahaVikas Aghadi News, BJP Latest News
Local Body Election News, MahaVikas Aghadi News, BJP Latest NewsSarkarnama

पुणे : राज्यातील 17 जिल्ह्यातील 92 नगरपालिका व चार नगरपंचायतींच्या निवडणूकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी जाहिर केला. त्यानुसार 18 ऑगस्ट रोजी मतदान व 19 ऑगस्टला मतमोजणी होणार आहे. सत्तानाट्यानंतर राज्यातील ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भाजपच्या बड्या नेत्यांची ताकद महिनाभरातच कळणार आहे. (Local Body Election News)

नगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेतील (Shiv Sena) शिंदे गट आणि भाजपची (BJP) आघाडी होऊ शकते. पण त्याआधी शिवसेना नेमकी कुणाची, याची कायदेशीर लढाई लढावी लागणार आहे. निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी कायम राहणार की नाही, याबाबतही साशंकता आहे. अनेकदा स्थानिक पातळ्यांवरील आघाड्या बदलत असतात. पण सध्याच्या राजकीय स्थितीत महाविकास आघाडी विरूध्द शिंदे सरकार असाच सामना रंगण्याची दाट शक्यता आहे. या निवडणुकीत बंडखोर आमदारांनाही आपली ताकद दाखवावी लागणार आहे.

Local Body Election News, MahaVikas Aghadi News, BJP Latest News
उद्धव ठाकरेंचा एक घाव दोन तुकडे; बंडखोर आमदारांचे परतीचे दोर कापले

निवडणूक होणाऱ्या नगरपालिकांमध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या बारामतीचाही समावेश आहे. इथे राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. पण भाजप जोर लावणार हे निश्चित आहे. तसेच इंदापूर, दौंड, सासवड, आळंदी नगरपालिकेत पवारांना ताकद दाखवावी लागणार आहे. इंदापूरमध्ये आमदार दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रतिष्ठेची लढाई असेल. दौंडमध्ये आमदार राहुल कुल आणि राष्ट्रवादीचे रमेश थोरात एकमेकांसमोर मैदानात असतील.

माजी मंत्री विजय शिवतारे यांनी उघडपणे शिंदे गटाचं समर्थन केलं आहे. त्यामुळे सासवड नगरपालिकेत आमदार संजय जगताप आणि शिवतारे यांच्यात थेट लढत होईल. परळी वैजनाथमध्ये आमदार धनंजय मुंडे आणि त्यांच्या भगिनी भाजप नेत्या पंकजा मुंडे आमनेसामने असतील. मागील निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी सत्ता काबीज केली होती. तर बीड नगरपालिकेच्या निवडणूकीत आमदार संदीप क्षीरसागर आणि त्यांचे काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यात पुन्हा जुंपणार आहे.

कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर, प्रवरा, राहूरी, पाथर्डी नगरपालिकांमध्ये भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचा कस लागेल. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, अंमळनेर, एरंडोल, यावल या नगरपालिकांच्या निवडणुका असून तिथेही भाजप विरूध्द महाविकास आघाडी सामना रंगणार आहे. सांगली जिल्ह्यातील तासगाव, पलूस, विटा नगरपालिकांमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आरआर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांना ताकद लावावी लागणार आहे.

Local Body Election News, MahaVikas Aghadi News, BJP Latest News
विधानसभेच्या निवडणुकीला तयार! उद्धव ठाकरेंनी थेट आव्हान दिलं...

या नगरपालिकांची होणार निवडणूक :

अ वर्ग नगरपालिका- भुसावळ, बारामती, बार्शी, जालना, बीड व उस्मानाबाद

ब वर्ग नगरपालिका- मनमाड, सिन्नर, येवला, दोंडाईचा वरवाडे, शिरपूर वरवाडे, शहादा, अंमळनेर, चाळीसगाव, कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर, चाकण, दौंड, कराड, फलटण, इस्लामपूर, विटा, अक्कलकोट, पंढरपूर, अकलूज, जयसिंगपूर, कन्नड, पैठण, अंबेजोगाई, माजलगाव, परळी वैजनाथ, अहमदपूर, अंजनगाव सुर्जी,

क वर्ग नगरपालिका- चांदवड, नांदगाव, सटाणा, भगूर, वरणगाव, धरणागाव, एरंणडोल, फैजपूर, पारोळा, यावल, जामखेड, शेवगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी, राहता, राहुरी, राजगुरुनगर, आळंदी, इंदापूर, जेजुरी, सासवड, शिरुर, म्हसवड, रहिमतपूर, वाई, आष्टा, तासगाव, पलूस, मोहोळ, दुधनी, करमाळा, कुर्डुवाडी, मैंदर्गी, मंगळवेढा, सांगोला, गडहिंग्लज, कागल, कुरुंदवाड, मुरगूड, वडगाव, गंगापूर, खुलताबाद, अंबड, भोकरदन, परतूर, गेवराई, किल्लेधारुर, भूम, कळंब, मुरुम, नळदुर्ग, उमरगा, परांडा, तुळजापूर, औसा, निलंगा, दर्यापूर, देउळगावराजा,

नगरपंचायती- नेवासा, मंचर, माळेगाव बुद्रुक, अनगर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in