त्या मोठ्या माणसांना अकलेचे धडे : राणेंचा अजितदादांना पुन्हा टोला

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडीने ( Mahavikas Aghadi ) भाजपचे ( BJP ) ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे ( Narayan Rane ) यांच्या समर्थकांना पराभूत करण्याचा प्रयत्न केला.
त्या मोठ्या माणसांना अकलेचे धडे : राणेंचा अजितदादांना पुन्हा टोला
Narayan Rane - Ajit PawarSarkarnama

ओरोस ( जि. सिंधुदुर्ग ) - सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडीने ( Mahavikas Aghadi ) भाजपचे ( BJP ) ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे ( Narayan Rane ) यांच्या समर्थकांना पराभूत करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही राणे यांनी बँकेवरील आपले वर्चस्व सिद्ध करून दाखविले. या निवडीनंतर राणे कुटूंबियांकडून महाविकास आघाडीतील नेत्यांवर आरोप होत आहेत. Lessons learned from those big men: Rane's scolded Ajit Dad again

सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीनंतर केंद्रीय मंत्री राणे यांनी बँकेचे नूतन अध्यक्ष मनीष दळवी व उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांचे अभिनंदन केले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

Narayan Rane - Ajit Pawar
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेत राणेंचा विजय झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन;अजित पवार,पाहा व्हिडिओ

नारायण राणे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठं मोठी लोक आली. फार काय काय बोलली. ती जिल्ह्यात अक्कल सांगायला आली होती. आज त्यांना अकलेचे धडे मिळाले असतील असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी लगावला. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष आणि उपाध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर यांच्यासाठी पारदर्शक कारभार करतील, असा विश्वासही त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

राणे पुढे म्हणाले की, ‘‘सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जनतेला अक्कल सांगण्याचा प्रयत्न आलेल्या मोठ्या माणसांनी केला; मात्र निवडणूक निकाल आणि आजची निवडणूक पाहता मोठ्या माणसांना आज अकलेचे धडे मिळाले असतील.’’

Narayan Rane - Ajit Pawar
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेत राणेंचा विजय झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन;अजित पवार,पाहा व्हिडिओ

त्यांनी सांगितले की, ‘‘आतापर्यंत जेवढ्या निवडणुका माझ्या नेतृत्वाखाली जिंकून दिल्या गेल्या, त्या विजयी झालेल्या सर्वांनीच चांगल काम केले आहे. फक्त एक अपशकुन झाला. तो एका व्यक्तीचा केला. त्यालाही आपण पळवून लावले आहे. हा अपशकुन गद्दार निघाला. त्याची आता लपाछपी चालू आहे. तो जिल्ह्यात उघड मानेने फिरू शकत नाही. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा आणि माझा काही सबंध नाही. जिल्हा बँकेकडून संस्थेसाठी कर्ज काढले आहे. वर्षाला 7 ते 8 कोटी रुपये व्याज भरतोय. गोरगरीबांचे प्रश्न सुटावे म्हणून जिल्हा बँकेवर माझा अंकुश होता.’’

Narayan Rane - Ajit Pawar
सिंधूदुर्ग जिल्हा भाजप कार्यकारिणीत निलेश, नितेश राणे

जुन्या कारभाराची चौकशी करणार

सलग चौथ्या वेळी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत सत्ता स्थापन झाली आहे. यापूर्वी त्यांच्या नेतृत्वाखाली चांगला कारभार झाला होता. मधल्या काही वर्षांत तो बदलला होता; मात्र त्या कारभाराची चौकशी भाजप करणार आहे. तसेच नवीन संचालक मंडळ, अध्यक्ष, उपाध्यक्ष चांगला कारभार करतील, असा विश्वास भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी व्यक्त केला.

सर्व संचालकांना सोबत घेऊन काम

जिल्हा बँक उपाध्यक्षपदी वर्णी लागल्यानंतर अतुल काळसेकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना जिल्हा बँकेत प्रामाणिकपणे काम केले जाईल, असे प्रतिपादन केले. आपल्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दाखविलेला विश्वास सार्थकी लावू, असा विश्वासही व्यक्त केला. तर यापूर्वी जिल्हा बँकेत झालेल्या चुकांची चौकशी केली जाईल, असेही स्पष्ट केले. सर्व संचालकांना सोबत घेऊन काम करताना 31 मार्च 2022 पर्यंत या आर्थिक वर्षातील उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in