माजी राज्यमंत्र्यांसह पाच आजी-माजी आमदारांनी प्रयत्न करूनही ‘सिद्धेश्वर’ची निवडणूक लागलीच!

सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यात नेतेमंडळींना अपयश
Dharmraj Kadadi
Dharmraj Kadadi Sarkarnama

सोलापूर : सोलापुरातील (Solapur) श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची (Siddheshwar Sugar Factory) निवडणूक बिनविरोध होण्यासाठी एक विद्यमान आमदार, एक माजी राज्यमंत्री आणि तब्बल चार माजी आमदारांसह अक्‍कलकोट, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील दिग्गज नेत्यांनी प्रयत्न केले. मात्र, शेवटी कारखान्याची निवडणूक लागलीच. कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्या धावपळीलाही यश आले नाही. (Leaders fail to hold election of Siddheshwar Sahakari Sugar Factory Unopposed)

गेल्या काही दिवसांपासून सोलापुरात सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना चर्चेत आहे. त्यातच कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाल्यामुळे अध्यक्ष काडादी यांना दोन्ही आघाड्यांवर लढावे लागत होते. त्यात धापवळीतही त्यांनी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न चालविले होते. सहकारी साखर कारखानदारी अडचणीत आहे, त्यामुळे सिद्धेश्वर कारखाना बिनविरोध करावा, असे आवाहन त्यांनी नेतेमंडळींना केले होते. उत्तर सोलापूर, अक्कलकोट, दक्षिण सोलापुरातील सर्वपक्षीय नेतेमंडळींची एक बैठकही झाली होती.

Dharmraj Kadadi
कृष्णा-भीमा प्रकल्पाबाबत राज्याकडून प्रतिसाद मिळेना : केंद्राचे खासदार निंबाळकरांना उत्तर

सर्वपक्षीय बैठकीत ठरल्याप्रमाणे नेतेमंडळी कामालाही लागली होती. त्यानुसार अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने, रतिकांत पाटील, अक्कलकोटचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील, सिद्धाराम चाकोते यांच्यासह राजशेखर शिवदारे, बाळासाहेब शेळके, सुरेश हसापुरे, मल्लिकार्जुन पाटील, श्रीशैल नरोळे, आप्पासाहेब पाटील, संजीव पाटील, बसवराज बगले, हरीश पाटील, शिवसिध्द बुळ्ळा, भिमाशंकर जमादार, कल्याणराव पाटील, दीपक आलुरे, सिद्राम वाकसे, अण्णाराव याबाजी या दिग्गज नेत्यांच्या प्रयत्नानंतरही श्री सिध्देश्‍वर साखर कारखान्याची निवडणूक अखेर लागली. त्या सर्वांचे पाठबळ काडादी यांच्या मागे असतानाही काहीजणांनी त्यांच्या आवाहनाला दाद दिली नाही.

Dharmraj Kadadi
राष्ट्रवादीतील कलहामुळे एक सदस्य असलेल्या काँग्रेसला मिळाली सत्तेची खुर्ची!

धर्मराज काडादी यांच्या ‘गंगा’ या निवासस्थानी कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली झाल्या. प्रत्येक नेत्यांनी त्यांच्या मर्जीतील उमेदवारांना अर्ज मागे घेण्याचे आवाहन केले. त्यानुसार निवडणूक आता बिनविरोध होणार, अशी सर्वांना आशा होती. मात्र, संगमेश काडादी व सिद्रामप्पा अब्दुलपूरकर यांनी बिनविरोध निवडणुकीला विरोध दर्शविला आणि कारखान्याच्या निवडणुकीचा बिगूल वाजला. परंतु, काडादींच्या विरोधातील पॅनेलमध्ये नेमके उमेदवार कोण, यासंदर्भात दोन दिवसांत चित्र स्पष्ट होणार आहे.

Dharmraj Kadadi
जयंत पाटलांच्या नेतृत्वाखालील आणखी एक संस्था बिनविरोध होणार?

दरम्यान, साखर कारखान्याच्या संदर्भातील विरोधकांचे षड:यंत्र हाणून पाडण्यासाठी केलेला संघर्ष बळीराजा कधीच विसणार नाही, याची खात्री असल्याची भूमिका धर्मराज काडादी यांनी स्पष्ट केली. तर विरोधकांनीही शेतकऱ्यांच्या हक्‍कासाठी आम्ही निवडणूक लढत असल्याचे स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com